लाडकी बहीण योजना: जून महिन्याचा हप्ता आला नाही? ‘हे’ करा! Ladki Bahin Yojana June Installment List Today

लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) जून महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यावर अजूनही जमा झाला नसतील, तर अजिबात काळजी करू नका! या संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ५ जुलै, शनिवारीपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली होती, परंतु ६ जुलैला रविवारची सुट्टी असल्यामुळे बँक व्यवहारांना थोडा वेळ लागत आहे. यामुळेच काही लाभार्थी महिलांना हप्ता मिळण्यास थोडा विलंब होत आहेत.


तुमचे पैसे कधीपर्यंत जमा होणार?

जर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असाल (Ladki Bahin Yojana Eligibility) आणि तुम्हाला यापूर्वीचे हप्ते नियमितपणे मिळाले असतील, तर तुम्हाला जून महिन्याचा हप्ता निश्चितपणे मिळणार आहे. तुमचे पैसे आज (सोमवार, ७ जुलै) किंवा उद्या (मंगळवार, ८ जुलै) रात्रीपर्यंत तुमच्या बँक खात्यात जमा होऊ शकतात. महिला व बालविकास राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ जुलैच्या रात्रीपर्यंत बहुतेक पात्र महिलांच्या खात्यात निधी जमा केला जाणार आहे.


हप्ता मिळण्यास विलंब होण्याची कारणे आणि सद्यस्थिती:

  • ५ जुलै २०२५ रोजी जून महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू झालेले आहे.
  • सध्या सुमारे ७०% पात्र महिलांना निधी प्राप्त झाला आहे, तर उर्वरित ३०% महिला अजूनही आपल्या हप्त्याची वाट पाहत आहे.
  • काही महिलांना हप्ता मिळण्यास उशीर होण्याचे मुख्य कारण म्हणजे रविवारची सुट्टी. यामुळे बँकिंग प्रक्रिया तात्पुरती थांबलेली होती.
  • आज सोमवार (७ जुलै) किंवा मंगळवार (८ जुलै) पर्यंत उर्वरित पात्र महिलांच्या बँक खात्यांमध्ये निधी जमा होण्याची अपेक्षा आहेत.

लाडकी बहीण योजना अधिकृत वेबसाईट: https://ladakibahin.maharashtra.gov.in/

कर्जमाफी यादी जाहीर: यादीत तुमचे नाव आहे का? असे तपासा ऑनलाईन! Farmer Loan 2026

ज्या महिला पात्र आहेत आणि ज्यांना मागील सर्व हप्ते वेळेवर मिळाले आहे, त्यांनी निश्चिंत राहावे. तुमचा जून महिन्याचा हप्ता पुढील एक ते दोन दिवसांत तुमच्या बँक खात्यात नक्कीच जमा होतील.

Disclaimer


टीप: तुम्ही तुमच्या बँकेच्या मोबाईल ॲप, नेट बँकिंगद्वारे किंवा पासबुक अपडेट करून तुमच्या खात्यातील शिल्लक तपासू शकतात. कोणत्याही शंकेसाठी आपल्या बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधा. किंवा आम्हाला कळवा.

तुमच्या मनातील अजून काही प्रश्न आहेत का? कमेंट्समध्ये नक्की कळवा!

लेक लाडकी योजना: मुलींना मिळणार १,०१,००० रुपये; असा करा अर्ज! Lek Ladaki Yojana 2026

पीएम किसान चे 2000 रुपये मिळण्यासाठी हे काम करा PM Kisan Yojana List

Leave a Comment