पिक विमा कोणत्या पिकासाठी किती पैसे भरावा लागणार? Crop Insurance 2025

Crop Insurance 2025: शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना! खरीप हंगामासाठीची पीक विमा योजना (Crop Insurance 2025) १ जुलै २०२५ पासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात करत आहे. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहे. आणि कोणत्या पिकासाठी किती रक्कम भरावी लागेल, याची सविस्तर माहिती आपण येथे पाहूया.


पीक विमा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • पिकपेरा (पीक पेरणीचे प्रमाणपत्र)
  • ७/१२ उतारा आणि ८अ
  • फार्मर आयडी

शासनाने आता १ रुपयाची पीक विमा योजना रद्द केली आहे. त्यामुळे, तुमच्या शेतीच्या एकूण क्षेत्रावर आणि पेरलेल्या पिकानुसार तुम्हाला पीक विम्याचा प्रीमियम भरावा लागणार आहे.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून व्यवसायासाठी 20 लाख बिनव्याजी कर्ज; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया PM Mudra Business Loan

शेतकऱ्यांना भरावा लागणारा अंदाजित विमा हप्ता (प्रति हेक्टर)

खालीलप्रमाणे विविध पिकांसाठी प्रति हेक्टर भरावा लागणारा विमा हप्ता नमूद केला आहे:

  • सोयाबीन – ₹1160
  • कपाशी – ₹900
  • तूर – ₹470
  • मक्का – ₹90
  • मूग – ₹70
  • उडीद – ₹62
  • ज्वारी – ₹82

Crop Insurance 2025

पीक विमा योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२५ आहे.

लाडकी बहीणींना रक्षाबंधनाला ₹3,000 मिळणार? जुलै-ऑगस्टचे हप्ते एकत्र मिळणार का? पहा

विमा अर्ज प्रक्रिया १ जुलै २०२५ पासून सुरू होईल. शेतकरी बांधवांनी वेळेत विमा भरून आपली पिके सुरक्षित करावीत. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडी काढला नसेल, त्यांनी तो लवकरात लवकर काढून घ्यावा, कारण त्याशिवाय पीक विमा भरणे शक्य होणार नाही.

Leave a Comment