Weather Report Today पुढील 4 दिवस ‘या भागात’ मुसळधार पावसाचा इशारा

Weather Report Today: सध्या राज्यभरात जोरदार मान्सूनला सुरुवात झालेली आहे. राज्यामध्ये कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भाचा संपूर्ण भाग व्यापल्याचे पाहायला मिळते आहे. 26 मे 2025 रोजी मान्सूने राज्याचा आणि मा भाग व्यापलेला होता आणि नंतर 20 दिवस थांबलेला होता. कारण त्यावेळी राज्यात व मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण तयार झालेली नव्हतं. 15 जून 2025 पासून राज्यभरात अनेक ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे. कारण आता सध्या पावसाचे पोषक वातावरण झाल्याचे पाहायला मिळते आहे.

Weather Report Today

राज्यभरामध्ये मान्सून ने संपूर्ण कोकण, खानदेश, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा संपूर्ण भाग व्यापलेला आहे. तसेच विदर्भामध्ये देखील बहुतेक भागांमध्ये प्रवेश केलेला आहे. मान्सून ने छत्तीसगड व ओडिशा राज्यामध्ये देखील प्रगती केलेली असून गुजरात मध्य प्रदेश मध्ये देखील मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाला सरुवात झाल्याचे पाहायला मिळते आहे.

कर्जमाफी यादी जाहीर: यादीत तुमचे नाव आहे का? असे तपासा ऑनलाईन! Farmer Loan 2026

Gold Rate Today सोन्याच्या दरात मोठे बदल! आजचे लाईव्ह भाव पहा

पुढील 24 तासांमध्ये मान्सून विदर्भाचा उर्वरित भाग व्यापणार आहे. तसेच छत्तीसगड उडीसा मध्य प्रदेश गुजरात या भागांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात दाखल होऊन मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे.

लेक लाडकी योजना: मुलींना मिळणार १,०१,००० रुपये; असा करा अर्ज! Lek Ladaki Yojana 2026

पुढील 4 दिवस ‘या भागात’ मुसळधार पाऊस

  • हवामान खात्याने कोकणामध्ये आज आणि उद्या मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज दिलेला आहे. घाटमाथ्यावर पुणे, सातारा जिल्ह्यामध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा दिलेला असून रेड अलर्ट जार करण्यात आलेला आहे.
  • रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, पालघर, ठाणे, अमरावती नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे.
  • विदर्भामध्ये इतर जिल्हे व खानदेशामधील तीन जिल्हे आणि छ. संभाजीनगर, या जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
  • मराठवाड्यामध्ये उर्वरीत जिल्ह्यात मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
  • सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सातारा आणि पुणे या घाटमाथ्याच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात येत आहे.
  • विदर्भामधील सर्व जिल्ह्यांसाठी पुढील पाच दिवसांसाठी मुसळधार पावसासाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
  • मराठवाड्यामधील जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवसांसाठी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

बांधकाम कामगारांना वर्षाला 12 हजार रुपये मिळणार; असा करा अर्ज Bandhkam Kamgar Pension Yojana List

1 thought on “Weather Report Today पुढील 4 दिवस ‘या भागात’ मुसळधार पावसाचा इशारा”

Leave a Comment