बांधकाम कामगारांना वर्षाला 12 हजार रुपये मिळणार; असा करा अर्ज Bandhkam Kamgar Pension Yojana List

Bandhkam Kamgar Pension Yojana List: नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर नोंदणीकृत बांधकाम कामगार ( Bandhkam Kamgar Yojana) असाल तर तुम्हाला आता वार्षिक 12,000 पेन्शन मिळू शकतात. या संदर्भातील जी माहिती आहे ती विधानपरिषद मध्ये जे बांधकाम कामगार मंत्री आहेत अँड.आकाश फुंडकर यांनी दिलेली आहे. तुम्हाला माहीतच असेल की नोंदणीकृत बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळतो. यामध्ये मग मुलीच्या लग्नासाठी 51 हजार रुपये असेल किंवा घरकुल योजनेसाठी आर्थिक सहाय्य असेल की भांडी योजना असेल सुरक्षा संच असेल अशा अनेक प्रकारचा लाभ हा बांधकाम कामगारांना मिळत असतो. त्यासाठी तुमची बांधकाम कामगार नोंदणी होणार आवश्यक आहे. यासोबतच आता 12,000 पेन्शन देखील मिळणार आहे.

Bandhkam Kamgar Yojana

बांधकाम कामगारांना पेन्शन म्हणजेच बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन योजना तर या योजनेचे निकष कसे आहेत? कोणत्या प्रकारच्या बांधकाम कामगारांनाही लाभ मिळतो? या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत.

Gold Rate Today सोन्याच्या दरात मोठे बदल! आजचे लाईव्ह भाव पहा

सातबारा उतारा ऑनलाइन मोबाइल से फ्री में कैसे डाउनलोड करें? Land Record
सातबारा उतारा ऑनलाइन मोबाइल से फ्री में कैसे डाउनलोड करें? Land Record

बांधकाम कामगारांना वर्षाला 12 हजार रुपये पेन्शन मिळणार

राज्यभरातील बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे ज्यांनी नोंदणी केली आहे आणि वयाची 60 वर्षे पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना दरवर्षी 12 हजार रुपये इतके निवृत्ती वेतन देणार असल्याची माहिती ही कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी विधान परिषदेमध्ये निवेदनाच्या माध्यमातून जाहीर केलेली आहे.( Bandhkam Kamgar Pension Yojana List)

राज्याचे कामगार मंत्री फुंडकर सांगतात की, 1996 मध्ये केंद्र सरकारने इमारत आणि इतर बांधकाम कामगारांच्या हिताचा कायदा लागू केलेला आहे त्यानुसार राज्य सरकारने 2007 मध्ये विविध नियम देखील आखलेले होते आणि 2011 मध्ये राज्य सरकारने बांधकाम कामगार कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे या मंडळाकडे 18 ते 60 वर्षे वयोगटामधील कामगारांसाठी नोंदणी करता येत आहे आणि याच्यामध्ये मधून राज्यभरातील विविध सरकारी योजनांचा सोबतच विशेष योजनांचा लाभ देखील मिळवता येत आहे मात्र साठ वर्षानंतर त्यांची नोंदणी करता येणार नाही आणि या कोणत्याही योजनेचा लाभ देखील मिळवता येणार नाही.

अशी गोष्ट लक्षात घेता सरकारने निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतलेला असून या योजनेच्या माध्यमातून नोंदणी कालावधीवर आधारित लाभ निश्चित करण्यात आल्याची माहिती फुंडकर यांनी दिलेली आहे.

१८८० सालापासूनचे जुने खाते उतारे आणि जमिनीची माहिती आता घरबसल्या मोबाईलवर पहा Old Land Records
१८८० सालापासूनचे जुने खाते उतारे आणि जमिनीची माहिती आता घरबसल्या मोबाईलवर पहा Old Land Records

Bandhkam Kamgar Pension Yojana List

  • दहा वर्ष नोंदणी पूर्ण झालेल्या कामगारांना वार्षिक 6 हजार रुपये मिळणार आहेत.
  • पंधरा वर्षे नोंदणी पूर्ण झालेल्या बांधकाम कामगारांना वार्षिक 9000 रुपये मिळणार आहेत.
  • वीस वर्ष किंवा त्याच्यापेक्षा अधिक कालावधी बांधकाम कामगार म्हणून झालेली असल्यास 12 हजार रुपये वार्षिक लाभ देण्यात येणार आहे.

Ladki Bahin Yojana June Installment Date लाडक्या बहिणींना जून चे 1500 कि 2100 रूपये मिळणार?

अशा प्रकारचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला असल्यामुळे राज्यभरातील 58 लाख पेक्षा अधिक बांधकाम कामगारांना तसेच त्यांच्या कुटुंबांना याचा लाभार्थी म्हणून फायदा घेता येणार आहे. आणि तुम्हाला जर बांधकाम कामगार योजनेविषयी कोणते प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवू शकता. (Bandhkam Kamgar Pension Yojana List)

4 thoughts on “बांधकाम कामगारांना वर्षाला 12 हजार रुपये मिळणार; असा करा अर्ज Bandhkam Kamgar Pension Yojana List”

  1. माझ्या मुलाचे शिष्यवृत्ती फार्म भरावयाचे आहे माझ्याकडे राशन कार्ड नाही तेंव्हा मी काय करू

    Reply
  2. आधार नंबर चुकीचा झालेला आहे परंतु अर्ज करून सुद्धा ते दुरुस्त करत नाही ते लवकर करून देण्याचे विनंती हे तुम्ही सरकारला सांगा

    Reply

Leave a Comment