Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2025: वसई विरार महानगरपालिकेच्या अंतर्गत विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर झालेली आहेत या महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीमध्ये विविध प्रकारचे 110 पदांचा समावेश करण्यात आलेला आहे. अर्ज करण्या अगोदर संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक पाहणे गरजेचे आहे.
या भरती अंतर्गत खालील पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे:
- बालरोगतज्ञ (Pediatrician)
- एपिडेमियोलॉजिस्ट (Epidemiologist)
- MBBS पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी
- MBBS अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी
- 15 वी वित्त योजना अंतर्गत MBBS / BAMS वैद्यकीय अधिकारी
- स्टाफ नर्स (पुरुष व महिला)
- फार्मासिस्ट
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician)
- बहुउद्देशीय आरोग्य सेवक (MPW)
Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2025
शैक्षणिक पात्रता:
प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे आहे:
- बालरोगतज्ञ – MD (Paediatrics) / DCH / DNB
- एपिडेमियोलॉजिस्ट – कोणताही वैद्यकीय पदवीधर आणि MPH / MHA / MBA (Health)
- वैद्यकीय अधिकारी (MBBS) – MBBS पदवी आणि MCI/MMC नोंदणी आवश्यक
- स्टाफ नर्स – GNM किंवा B.Sc Nursing पदवी
- फार्मासिस्ट – D.Pharm किंवा B.Pharm, तसेच MPC नोंदणी आवश्यक
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ – DMLT किंवा B.Sc (Lab Tech)
- MPW (बहुउद्देशीय आरोग्य सेवक) –
- १२वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण
- Paramedical बेसिक ट्रेनिंग किंवा Sanitary Inspector कोर्स उत्तीर्ण
- अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
वेतनश्रेणी (प्रत्येक पदानुसार): Mahanagarpalika Bharti 2025
- बालरोगतज्ञ :– ₹75,000/- प्रति महिना
- एपिडेमियोलॉजिस्ट :– ₹35,000/- प्रति महिना
- MBBS पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी : – ₹75,000/- प्रति महिना
- MBBS अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – ₹30,000/- प्रति महिना
- BAMS / MBBS: – 15 वी वित्त योजना अंतर्गत – ₹60,000/- प्रति महिना
- BAMS वैद्यकीय अधिकारी (कामावर आधारित मोबदला सहित) – ₹25,000/- + ₹15,000/- = ₹40,000/-
- स्टाफ नर्स : (GNM/B.Sc) – ₹34,800/- प्रति महिना
- फार्मासिस्ट : – ₹20,800/- प्रति महिना
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ : – ₹18,700/- प्रति महिना
- बहुउद्देशीय आरोग्य सेवक: (MPW) – ₹18,000/- प्रति महिना
मुलाखतीसाठी उपस्थित राहणे:
- मुलाखतीचा कालावधी: २८ मे २०२५ ते ०५ जून २०२५
अर्ज कसा करावा:
- या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरून संबंधित कार्यालयात पाठवायचे आहेत.
- अर्जासोबत सर्व आवश्यक प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रती जोडणे बंधनकारक आहे.
अर्ज पाठवण्याचा कालावधी:
- 28 मे 2025 ते 05 जून 2025 दरम्यान अर्ज पाठवावे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता:
- वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, तळमजला, यशवंत नगर, विरार (पश्चिम) या पत्यावर पाठवावे.
अर्जामध्ये जोडायची कागदपत्रे:
- अर्ज फॉर्म (स्वतः टाईप केलेला किंवा जाहिरातीनुसार) आवश्यक
- शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे आवश्यक
- अनुभव प्रमाणपत्र (जर लागू असेल) आवश्यक
- जन्मतारीख दाखवणारे प्रमाणपत्र आवश्यक
- ओळखपत्र आवश्यक
- पासपोर्ट साईज फोटो आवश्यक