Ladki Bahin Yojana May Installment: लाडक्या बहिणींनो, मे महिन्याचे 1500 रुपये बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात

Ladki Bahin Yojana May Installment: “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे” मे महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार आहेत? अशा प्रकारचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात विचारण्यात येत होता. या प्रश्नाचे उत्तर अदिती तटकरे यांनी दिलेलं होतं. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार, आज पासून लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये जमा होत आहे‌त. महिलांच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्हाला पैसे जमा झाले आहेत. की नाही हे तुम्ही आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात चेक करू शकतात. आणि कशाचे करायचे हे देखील आपण या लेखाच्या माध्यमातून पाहूयात.

Ladki Bahin Yojana May Installment

आज पासून लाडक्या बहिणीचे पैसे जमा होत आहेत. त्या संदर्भात माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित तटकरे यांनी एक्स (X) दिलेली आहे.

जुलै 2024 मध्ये माहिती सरकारकडून राबवली गेलेली “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” राज्य सरकारची एक महत्वकांशी योजना असून याचा अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांमधील महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये देण्यात येतात. या योजनेच्या माध्यमातून महिला आतापर्यंत सुद्धा हप्ते जमा करण्यात आलेली होती. आणि हा 11 वा हप्ता आज 5 जून 2025 पासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. अशाप्रकारे एकूण 11 हप्ते महिलांना जमा करण्यात आलेले आहेत.

ज्येष्ठ नागरिकांना दरमहा ₹६,००० मानधन आणि ₹५ लाखांचा मोफत उपचार; पाहा पात्रता व नियम Senior Citizen New Yojana

मे महिन्याचे 1500 रूपये जमा होण्यास सुरुवात, तुम्हाला आले का? चेक करा Ladki Bahin Yojana May Installment Status

एप्रिल महिन्याचा हप्ता हा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जमा करण्यात आलेला होता. आणि मे महिना उलटून गेला असताना देखील मे महिन्याचे 1500 रुपये जमा करण्यात आलेले नव्हते. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर महिला कडून देखील विचारणा होत होती. त्याच्यावरच बोलतच अदिती तटकरे यांनी दोन दिवसा खाली सांगितले होते. की लवकरच लाडक्या बहिणींना मे महिन्याचे पैसे जमा करण्यात येतील.

आदिती तटकरे यांनी काय सांगितले?

राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना मे महिन्याचा हप्ता वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या आधार लिंक ( Aadhar Link) असलेल्या खात्यावरती पैसे जमा करण्यात येणार आहेत. महायुती सरकारने दृढनिश्चय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन तसेच महाराष्ट्रामधील लाडक्या बहिणींचा आमच्यावर असलेला दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढे देखील अशीच सुरू राहील असा मला विश्वास आहे – असं राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी पोस्टमध्ये म्हटलेले आहे.

मोफत भांडी वाटप योजना सुरू! पाहा पात्रता आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रिया येथे Bandhkam Kamgar Yojana 2026

लाडकी बहीण योजना अधिकृत वेबसाईट:https://ladakibahin.maharashtra.gov.in/

Leave a Comment