मे महिन्याचे 1500 रूपये जमा होण्यास सुरुवात, तुम्हाला आले का? चेक करा Ladki Bahin Yojana May Installment Status

Ladki Bahin Yojana May Installment Status: नमस्कार मित्रांनो, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने” च्या पात्र असलेले लाखो लाभार्थी महिलांसाठी अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे. मे महिन्याचा प्रलंबित असलेला हप्ता आज 5 जून 2025 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेच्या पात्र महिला लाभार्थीच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी सुरुवात झालेली आहे.

लाडक्या बहिणींना मे चे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात

लाडक्या बहिणींना, मे महिन्याचे पंधराशे रुपये जमा करण्यात येईल सुरुवात झालेली आहे अशा प्रकारची पोस्ट महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी एक्स (X) वरती दिलेली आहे. लाडके बहिणींना आपले पैसे आले किंवा नाही अशा प्रकारचे प्रश्न पडलेला आहे. ते चेक कसे करायचे? हे देखील आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत.

Ladki Bahin Yojana May Installment Status

ज्येष्ठ नागरिकांना दरमहा ₹६,००० मानधन आणि ₹५ लाखांचा मोफत उपचार; पाहा पात्रता व नियम Senior Citizen New Yojana

मित्रांनो एकंदरी आपण यापूर्वी 2900 कोटी रुपयांचा निधी हा लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वितरणासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून ‘आदिवासी विकास विभागाचा’ याचबरोबर आपण जर पाहिलं तर जे काही ‘सामाजिक न्याय व विशेष सहभागाचा निधी’ योजनेसाठी वर्ग करण्यात आलेला होता.

जून महिन्यामध्ये वटपौर्णिमा एक महत्त्वाचा सण आहे. आणि या सणाच्या पार्श्वभूमी हे 3,000 एकत्र दिल्या जातील अशा शक्यता वर्तवण्यात येत होत्या. परंतु याच्या ऐवजी आता फक्त मे महिन्याचा प्रलंबित हप्ता 1500 रुपये 5 जून 2025 पासून या जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.

हा जून महिन्याचा हप्ता वितरित केल्यानंतर जून महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी सुद्धा निधी उपलब्ध असणार‌ आहे. त्याच्यामुळे लवकरच पुढे जून महिन्याचा हप्ता देखील वितरित केला जाणार आहे. परंतु त्याच्या संदर्भातील जे काही अपडेट येतील ते अपडेट आपण वेळोवेळी जाणून घेऊयात.

मोफत भांडी वाटप योजना सुरू! पाहा पात्रता आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रिया येथे Bandhkam Kamgar Yojana 2026

जून 2025 मध्ये पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपयांचा वितरित केला जाणार आहे. याच्यामध्ये जे काही लाभार्थी “पी एम किसान” आणि “नमो शेतकरी“ या योजनांचा लाभार्थी असतील अशा लाभार्थ्यांना मात्र 500 रुपयांचे मानधन त्यांच्या खात्यामध्ये डीबीटी च्या माध्यमातून जमा केलं जाणार आहे. काही सरकारी कर्मचारी असलेल्या किंवा ज्यांचं उत्पन्न हे जास्त आहे अशा महिला लाभार्थी याच्यामध्ये पात्र झालेल्या होत्या. त्या लाभार्थ्यांची छाटणी किंवा त्या लाभार्थ्यांना अपात्र करण्याची मोहीम सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून राबवली जात आहे.

लाडकी बहीण योजनेचा हप्ता चेक कसा करायचा?

  • लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता( Ladki Bahin Yojana May Installment Status ) जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. हे 1500 रुपये डीबीटी ( DBT )मार्फत महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येत आहेत. हे पैसे जमा झाले की नाही? हे कसे चेक करायचे? हे पाहूयात
  • तुम्ही तुमची जी बँक आहे त्या बँकेच्या कस्टमर केअर ( Customer Care ) ला फोन करून तुमचा हप्ता 1500 रुपये जमा झाला आहे का? विचारू शकता.
  • तुम्ही आपल्या मोबाईल वरून “ऑनलाईन बँकिंग“ किंवा मोबाईल ॲप माध्यमातून “नेट बँकिंग” द्वारे आपले बँकेचे स्टेटमेंट पाहू शकतात.
  • या पद्धतीने तुम्ही लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये जमा झाले आहेत किंवा नाही हे सहज आणि सोप्या पद्धतीने चेक करू शकता.
  • आणि जर तुम्हाला पैसे जमा झाले नसतील तर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • लाडकी बहीण योजनेच्या https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही आपला हप्ता जमा झाला आहे. किंवा नाही? हे देखील पाहू शकता. आणि जर जमा झाला नसेल, तर कोणत्या कारणामुळे जमा झालेला नाही. हे कारण देखील तुम्हाला आपल्या प्रोफाइल मध्ये चेक करता येते. ( Ladki Bahin Yojana May Installment Status)

1 thought on “मे महिन्याचे 1500 रूपये जमा होण्यास सुरुवात, तुम्हाला आले का? चेक करा Ladki Bahin Yojana May Installment Status”

  1. कट्टर शिवसेना बीजेपी भक्त माजी तिसरी पिढी आहे शिवसेना आणि बीजेपी यांना वोट वोटिंग आतापर्यंत पी एम सीएम किसान पीएम आवास मिळालाच नाही असे का झालं आहे 🙏कृपया मला सांगा गीताराम आसाराम नाईक नवरे गाव वाकी तालुका सेलू जिल्हा परभणी महाराष्ट्र आहे जमीन पिंपळा खुर्द

    Reply

Leave a Comment