सोलर पंप योजना: जिल्हानिहाय लाभार्थी यादी ऑनलाईन कशी पाहायची?

प्रधानमंत्री कुसुम (PM-KUSUM) सोलर योजना ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतात सोलर पंप बसवण्यासाठी ९०% पर्यंत सबसिडी (अनुदान) दिली जाते. जर तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज केला असेल, तर महाऊर्जा (MAHAURJA) किंवा केंद्र सरकारच्या MNRE पोर्टलवर लाभार्थी यादी (Beneficiary List) ऑनलाईन जाहीर केली जाते.

खालील स्टेप-बाय-स्टेप माहितीचा वापर करून तुम्ही तुमचे नाव यादीत आहे की नाही ते सहज तपासू शकता:

राज्य सरकारकडून ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’ सुरू 

शासनाकडून ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना सिंचनासाठी सौर कृषी पंप उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज देखील मागवण्यात आले आहेत.

कुसुम सोलर योजना लाभार्थी यादी ऑनलाईन तपासण्याची पद्धत (Step-by-Step)

  • स्टेप १: अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या
    • तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर केंद्र सरकारच्या PM-KUSUM National Portal (pmkusum.mnre.gov.in) किंवा महाऊर्जाच्या पोर्टलवर (kusum.mahaurja.com) जा.

स्टेप २: Public Information विभागात जा

  • मुख्य पानावर (Homepage) खालील बाजूला किंवा मेन्यू बारमध्ये असलेल्या Public Information पर्याय शोधा.

स्टेप ३: ‘Scheme Beneficiary List’ निवडा

लाडकी बहीण योजना सप्टेंबर हप्ता 1500 रूपये कधी जमा होणार? जाणून घ्या Ladki Bahin Yojana Personal
  • Public Information पर्यायावर क्लिक केल्यानंतर ‘Scheme Beneficiary List’ किंवा ‘Beneficiary Status’ हा पर्याय निवडा.

स्टेप ४: तुमचा राज्य, जिल्हा आणि तालुका निवडा

  • State: Maharashtra (महाराष्ट्र) निवडा.
  • District / Block: तुमचा संबंधित जिल्हा आणि तालुका निवडा.

Component: सोलर पंपासाठी Component B हा पर्याय निवडा.

स्टेप ५: यादी शोधा आणि डाऊनलोड करा (View/Download List)

  • सर्व माहिती भरल्यानंतर ‘Submit’ किंवा ‘Search’ बटनावर क्लिक करा.
  • तुमच्या तालुक्याची/गावाची मंजूर झालेल्या लाभार्थ्यांची यादी स्क्रीनवर दिसेल.

यादीत तुमचे नाव, अर्जाचा क्रमांक (Application No), आणि मंजूर झालेल्या सोलर पंपाची क्षमता (HP) तपासा.

तुम्ही ही संपूर्ण यादी PDF स्वरूपात डाऊनलोड देखील करू शकता.

यादीत नाव असल्यास पुढील प्रक्रिया काय?

१. मेसेज आणि चालान (Challan): तुमचे नाव मंजूर यादीत आल्यानंतर तुम्हाला महाऊर्जाकडून SMS द्वारे कळवले जाते आणि पोर्टलवर किसान हिस्सा (Demand Draft / Online Payment) भरण्यासाठी लिंक मिळते.

गुंठेवारी जमीन खरेदी-विक्रीचे नियम बदलले? 1 ते 5 गुंठे जमीन घेण्यापूर्वी सातबारा हे नियम पहा! Land Record Satbara Online 2026

२. रक्कम भरणे: तुम्हाला द्यावयाचा १०% शेतकरी हिस्सा ऑनलाईन पद्धतीने भरावा लागतो.

३. व्हेंडर निवड (Vendor Selection): पेमेंट यशस्वी झाल्यावर सोलर पंप बसवण्यासाठी उपलब्ध कंपन्यांपैकी एका व्हेंडरची निवड करावी लागते.

४. पंप इन्स्टॉलेशन: व्हेंडर निवडीनंतर तुमच्या शेतात प्रत्यक्ष पाहणी करून सोलर पंप बसवण्याचे काम पूर्ण केले जाते.

Leave a Comment