PM Kisan Yojana 20 th Installment List: केंद्र सरकारकडून सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पुढे येत आहे. यामध्ये शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा ‘20 वा हप्ता’ जून 2025 मध्ये लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. या अगोदर शेतकऱ्यांना 19 वा जमा करण्यात आलेला होता. “पी एम किसान सन्माननिधी योजनेचा” ( PM Kisan Sanman Nidhi Yojana) 20 वा हप्ता कधी मिळणार यासाठी शेतकरी खूप दिवसापासून प्रतीक्षेत होते. कारण खरीप हंगाम 2025 पेरणी जवळ आलेली असल्याने शेतकऱ्यांना बी-बियाणे तसेच खतांच्या खरेदीसाठी अनेक अडचणी निर्माण होत असतात. हप्ता लवकरच शेतकऱ्यांना जमा करण्यात येणार आहे.
पी एम किसान योजनेसाठी संपूर्ण देशभरातील पात्र शेतकरी लाभार्थी म्हणून लाभ घेत आहेत. या योजनेच्या माध्यमातून विविध 3 हप्त्यांमध्ये 2,000 प्रमाणे प्रत्येक वर्षाला 6 हजार रुपये केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना जमा करण्यात येतात. पीएम किसान सन्मान निधी योजनेचे आतापर्यंत एकूण 19 हप्ता जमा झालेले आहेत तर 20 वा हप्ता देखील शेतकऱ्यांना लवकरच खात्यावर जमा करण्यात येणार आहे.
पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता कधी मिळणार?
पी एम किसान सन्माननिधी योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना 20 वा हप्ता या महिन्यांमध्ये जमा करण्यात येणार आहे. लवकरच यायची माहिती तुम्हाला अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून देखील देण्यात येईल. याच्या अगोदर देखील केंद्र सरकारकडून 19 वा हप्ता हा फेब्रुवारी 2025 मध्ये पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे. या महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांना पीएम किसान चा 20 वा हप्ता 2,000 रुपये जमा होतील. अशा प्रकारची माहिती ही सध्या सगळीकडे वृत्तवाहिनी आणि प्रसार माध्यमांमध्ये पाहायला मिळत आहे.
एका कुटुंबात एकच व्यक्तीला लाभ ( PM Kisan Yojana 20 th Installment List )
पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत यात बदल करण्यात आलेले आहेत. या नवीन नियमावलीनुसार कुटुंबामधील पती-पत्नी, मुलगा, मुलगी लाभ घेत असतील तर आता ते बंद करण्यात येणार आहेत. आणि एका कुटुंबामध्ये केवळ एकाच व्यक्तीला या योजनेच्या माध्यमातून लाभ घेता येणार आहे. केंद्र सरकारने या योजनेविषयी अधिकृत नियमावली देखील जाहीर केलेली आहे. त्यामुळे लाभार्थी विषयक विविध बदल यामध्ये करण्यात आले असल्याचे पाहायला मिळत आहे.
Ladki Bahin Yojana List: ‘या महिलांचे’ पैसे बंद होणार! यादी जाहीर, नाव चेक करा
यादीत तुमचे नाव आहे का? येथे चेक करा ( PM Kisan Yojana 20 th Installment List )
- पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता तुम्हाला मिळणार आहे का? मिळाला नसेल तर कोणती कारण आहेत. चेक करण्यासाठी तुम्ही सर्वात प्रथम https://pmkisan.gov.in/ या वेबसाईटला भेट द्यावी लागते.
- या वेबसाईटला भेट दिल्यानंतर तुम्हाला येथे लाभार्थी स्टेटस पाहायला मिळते.
- पी एम किसान च्या अधिकृत वेबसाईटला भेट दिल्यानंतर तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती भरून लॉगिन करू शकता. आणि आपले नाव शोधू शकता.
- येथे तुम्हाला हप्ता मिळण्यासाठी काही अडचणी येत असतील तर स्टेटस मध्ये पाहायला मिळेल.
- आणि पीएम किसान योजनेचा 20 वा हप्ता मिळण्यासाठी तुम्हाला आपली ई कवायसी करणे देखील बंधनकारक आहे.
- तुम्ही जर आपली केवायसी केली नाही. तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ देखील मिळणार नाही. याची नोंद घ्यावी.