PM Kisan 20th Installment List: या तारखेला पीएम किसान योजनेचा 20 वा हप्ता 2000 रुपये मिळणार

PM Kisan 20th Installment List: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये चार महिन्यांच्या अंतराने विविध 3 हप्त्यामध्ये जमा करण्यात येत आहेत. देशभरातील पीएम किसान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना 19 वा हप्ता हा 24 फेब्रुवारी 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आलेला होता. आणि आता यात त्याला चार महिने पूर्ण झालेले आहेत. आणि अशा प्रकारे 20 हप्ता कधी मिळणार याची शेतकऱ्यांना देखील उत्सुकता लागलेली आहे.

PM Kisan 20th Installment List

मीडिया रिपोर्टनुसार, पी एम किसान चा विसावा हप्ता हा 20 जूनच्या (शुक्रवारी) दरम्यान पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डीबीटी ( Direct Benifits Transfer) द्वारे जमा करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमध्ये कार्यक्रमादरम्यान हप्ता जमा करण्याची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे.

24 फेब्रुवारी 2025 रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता वितरण हे एकूण 10 कोटी 4 लाख 67 हजार 693 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेला होता. आणि आता 20 हप्ता हा 9.88 कोटी पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे. आणि आता मिळणारा 20 हप्ता तुम्हाला जमा होण्यासाठी काही गोष्टीची पूर्तता करणे आवश्यक आहे ते पाहुयात.

शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांसाठी सरकारचा नवीन निर्णय जाहीर! School Student News

पीएम किसान चा 20 वा हप्ता मिळण्यासाठी हे काम करा

  • पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली केवायसी ( KYC ) करणे आवश्यक आहे.
  • हप्ता जमा होण्या अगोदर आपली सीडींग स्टेटस ऍक्टिव्हेट आहे का? आणि आपले लाभार्थी स्टेटस पाहणे आवश्यक आहे.
  • पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता जमा होण्यासाठी आपले ॲग्रीस्टॉक नोंदणी केलेली असणे देखील आवश्यक आहे.
  • शेतकऱ्यांना केवायसी करण्यासाठी आणि ॲग्रीस्टॉक नोंदणीसाठी सरकारकडून अतिरिक्त पंधरा दिवसांचा कालावधी वाढवून देण्यात आलेला होता.
  • तुमचे केवायसी स्टेटस चेक करण्यासाठी पी एम किसान च्या या https://pmkisan.gov.in/ अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • किंवा तुमची केवायसी झालेली नसेल तर तुम्ही जवळच्या सीएससी सेवा केंद्र देखील भेट देऊन आपली केवायसी करू शकता.
  • ॲग्रीस्टॉक नोंदणी देखील लवकरात लवकर करणे आवश्यक आहे. कारण ॲग्रीस्टॉक नोंदणी शिवाय तुम्हाला पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता मिळण्यासाठी देखील अडचणी येऊ शकतात.

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी ही एक महत्त्वपूर्ण योजना असून 2019 च्या लोकसभा निवडणुका अगोदर जाहीर केलेली आहे. योजनेच्या माध्यमातून दरवर्षी सहा हजार रुपये शेतकऱ्यांना डीबीटी द्वारे बँक खात्यावर जमा करण्यात येत आहेत. ही योजना सुरू झाली असून 3.04 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिकची रक्कम शेतकऱ्यांना जमा करण्यात आलेली आहे.

पी एम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी हे अधिकृत वेबसाईटला ( https://pmkisan.gov.in/ ) भेट देऊन हप्त्याची रक्कम मिळाली आहे का? हे घरबसल्या देखील चेक करू शकतात. योजना सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांना 19 हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत. म्हणजेच या योजनेचे माध्यमातून एकूण 38 हजार रुपयांचा लाभ हा शेतकऱ्यांना मिळालेला आहे.

PM Kisan Installment Date

  • पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता पात्र शेतकऱ्यांना येत्या शुक्रवारी ( 20 जून) रोजी पात्र शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहार मधील सिवान भागाच्या दौऱ्यावर आहेत. तर ते तेथील कार्यक्रमादरम्यान 9.88 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने निधी वितरित प्रक्रिया पार पडणार आहे.
  • परंतु हा 20 वा हप्ता जमा होण्यासाठी आपली केवायसी असणे आवश्यक आहे. त्याशिवाय पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांना जमा होणार नाही.

Weather Report Today पुढील 4 दिवस ‘या भागात’ मुसळधार पावसाचा इशारा

Leave a Comment