Ladki Bahin Yojana May Installment Beneficiary List लाडक्या बहिणींना मे चे 1500 रुपये जमा! आले का? चेक करा

Ladki Bahin Yojana May Installment Beneficiary List: लडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यावर मे महिन्याचे 1500 रुपये 6 जून 2025 पासून जमा करण्यात आलेले आहेत.

लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुम्हाला जमा झाला की नाही पुढीलप्रमाणे चेक करा

आतापर्यंत लाडक्या बहिणींना एकूण 11 हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत. याचे मिळून 16,500 रुपयांचा लाभ हा लाडक्या बहिणींना देण्यात आलेला आहे.

2619 पदांची मेगाभरती सुरू; जाणून घ्या पात्रता आणि संपूर्ण वेळापत्रक MPSC Group C Recruitment 2026

1) अधिकृत वेबसाईट द्वारे ( Ladki Bahin Yojana Official Website)

  • सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या https://ladakibahin.maharashtra.gov.in/अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • येथे अर्जदार लॉगिन या पर्यायावर क्लिक करून लॉगिन करा.
  • येथे तुमचा नोंदणीकृत मोबाईल ( Mobile Number) नंबर आणि पासवर्ड तसेच कॅपचा कोड टाकून लॉगिन करा.
  • तुमची पेमेंट स्थिती ( Payment Status ) येथे चेक करू शकता.
  • तुम्हाला पैसे जमा झाले आहेत का? हे इथे दिसते तसेच पैसे जमा झाले नसेल तर कोणत्या कारणामुळे जमा झाले नाहीत. तुम्ही इथे कारण देखील पाहू शकता.

2) Nari Shakti Doot ॲप द्वारे तपासणी

  • सर्व प्ले स्टोर वरून नारी शक्ती दूत ॲप ( Nari Shakti Doot App) डाऊनलोड करून लॉग इन करा.
  • लॉगिन करताना तुम्ही तुमच्या अधिकृत मोबाईल नंबर आणि पासवर्ड वापर करून लॉगिन करू शकता.
  • येथे लॉगिन केल्या नंतर तुम्हाला आपल्या अर्जाची स्थिती तपसता येते. फक्त जमा झाला आहे किंवा नाही याचे स्टेटस देखील तुम्हाला येथे चेक करता येते. अशा प्रकारे तुम्ही ॲपच्या माध्यमातून देखील आपल्याला पैसे जमा झाले आहेत किंवा नाही याची माहिती घेऊ शकता.

3) बँक खात्यावर तपासणी करून

  • बँक खात्यातील पैसे तपासून देखील तुम्ही माहिती करू शकता की लाडकी बहिणी योजनेचा हप्ता जमा झाला आहे किंवा नाही.
  • ऑनलाइन बँकिंग/मोबाईल बँकिंग च्या माध्यमातून देखील तुम्ही आपले स्टेटमेंट पाहू शकता की पैसे जमा झाले आहेत किंवा नाही हे सहज तपासता येते.
  • SMS द्वारे लाडकी बहीण योजनेचा हप्तात जमा झाल्यास तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर मेसेज पाठवण्यात येतो.

लाडकी बहीण योजनेची यादी कशी पहायची?

  • लाडकी बहीण योजनेची यादी पाहण्यासाठी सर्वात प्रथम अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागते.
  • येथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड ने लॉगिन केल्यानंतर तुम्हाला “लाभार्थी यादी” Beneficiary Status Check वर क्लिक करायचे आहे.
  • येथे तुमचा जिल्हा तुमचा तालुका अशा प्रकारची तुमची माहिती निवडायची आहे.
  • येथे लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती ( Form Status) पाहता येते. येथे तुम्हाला तुमचे सर्व स्टेटस पाहता येते.

कर्जमाफीसाठी ही 3 कागदपत्रे बँकेत द्यावी लागणार, अन्यथा नाव यादीतून कट होणार? Farmer Loan

Leave a Comment