लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? गिरीश महाजनांचे उत्तर पहा Ladki Bahin Yojana Hapta Yadi

Ladki Bahin Yojana Hapta Yadi: लाडक्या बहिणीने 2100 रुपये कधी मिळणार अशा प्रकारचा प्रश्न विचारला असता गिरीश महाजन यांनी लाडकी बहीण योजनेचा संदर्भात उत्तर दिलेले आहे. महायुती सरकारने पुन्हा सत्तेत आल्यावर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ या आश्वासनावरती सत्ता स्थापन केली. आणि 2100 रुपये कधी मिळणार? असा प्रश्न विरोधी पक्षाकडून सध्या उपस्थित करण्यात येत आहे. तसे पाहता राज्यात महायुती सरकार ची सत्ता येण्यासाठी लाडकी बहीण योजनेचा महत्त्वाचा वाटा ठरला आहे.

Ladki Bahin Yojana Hapta Yadi

राज्यातील पात्र लाडक्या बहिणींना जुलै 2024 पासून आतापर्यंत एकूण 11 हप्त्याची रक्कम 1500 रुपयाप्रमाणे जमा करण्यात आलेले आहे. आणि या महिन्याच्या शेवटी लाडक्या बहिणींना 12 हप्ता देखील जमा करण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे.

2619 पदांची मेगाभरती सुरू; जाणून घ्या पात्रता आणि संपूर्ण वेळापत्रक MPSC Group C Recruitment 2026

महायुती सरकारने विधानसभा निवडणुकी अगोदर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा आश्वासन दिलेलं होतं. त्यामुळे लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? असा प्रश्न जळगाव मध्ये गिरीश महाजन यांना विचारण्यात आलेला होता त्यावर त्यांनी उत्तर दिलेले आहे.

गिरीश महाजन म्हणाले की, लाडक्या बहिणींना 1500 रुपये देणारी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” आम्ही सुरू केलेली आहे. याच्या माध्यमातून राज्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी 1500 रुपये देण्यात येत आहेत. निवडणुकीच्या काळामध्ये लाडक्या बहिणींना 2100 रुपये असे आश्वासन आम्ही दिले होते. परंतु अजून सत्ता येऊन एक वर्ष देखील पूर्ण झालेली नाही. आमची सत्ता येऊन सहा- सात महिने झाले आहेत आम्ही ते 2100 रुपये देखील देणार आहोत. त्याबद्दल सकारात्मक विचार देखील करत आहे. सध्या सरकारची आर्थिक अडचण झालेली आहे. हे तुम्हाला देखील माहिती आहे. लाडक्या बहिणींना नियमितपणे सरकारकडून 1500 रुपये जमा करण्यात येत आहेत. आणि 2100 रुपये देण्यासाठी आम्ही नाही म्हटलेलं नाही. सध्या लाडक्या बहिणी आमच्यावर खुश आहेत. असं गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद स्पष्ट सांगितले आहे.

कर्जमाफीसाठी ही 3 कागदपत्रे बँकेत द्यावी लागणार, अन्यथा नाव यादीतून कट होणार? Farmer Loan

पेट्रोल-डिझेल दरात मोठे बदल; इराण-इस्त्राईल युद्धाचा परिणाम Petrol Diesel Price Today

Leave a Comment