Ladki Bahin Karj Yojana: लाडक्या बहिणींना 0 टक्के व्याजदराने 1 लाख कर्ज, सरकारची मोठी घोषणा

Ladki Bahin Karj Yojana: राज्य सरकारने काल झालेल्या बैठकीमध्ये लाडक्या बहिणीसाठी अजून एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. चक्क लाडक्या बहिणींना 0 टक्के व्याजदर आणि कर्ज मिळणार आहे. याबद्दल सर्वात मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. याबद्दल माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. लाडकी बहीण योजना हे राज्य सरकारला निवडणुकीसाठी देखील गेम चेंजर ठरलेले आहे. आणखी प्रभावीपणे लाडकी बहीण योजना ही सर्व महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकारकडून काम करण्यात येत आहे. याचाच फायदा आता राज्यातील महिलांना होणार असून एक लाख रुपयांपर्यंत 0 टक्के व्याज दराने कर्ज देण्याची घोषणा राज्य सरकारने केलेली आहे.

Ladki Bahin Karj Yojana

“मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण” ( Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana) योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये बँक खात्यावर जमा करण्यात येतात. तसेच महिलांना आता स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा या उद्देशाने सरकारने अजून एक मोठा निर्णय घेतलेला आहे आता महिलांना अधिक सक्षम बनवण्यासाठी या योजनेला मुंबई बँकेच्या मदतीने शून्य टक्के व्याजदराने कर्ज दिले जाणार आहे. मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी नुकती सर्वात मोठी घोषणा केलेली असून या योजनेच्या माध्यमातून महिलांना शून्य टक्के व्याज दराने कर्ज वितरित करण्यात येणार असल्याची माहिती ही प्रवीण दरेकर यांनी नुकतीच जाहीर केलेली आहे. योजना मुंबईतील सर्व महिलांसाठी राबविण्यात येणार असून महिलांना अधिक सक्षम होण्यासाठी तसेच महिलांना स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी ही योजना महत्वपूर्ण ठरणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती की, लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारी पैसे हे उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून बाजारात आले पाहिजे त्यामुळे मुंबई वगळता राज्यभरातील इतर लाडक्या बहिणींना 9 टक्के व्याजदराने कर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि मुंबईमधील महिलांना तर थेट आता 0 टक्के व्याजदर नीच कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे मुंबईमधील महिलांमध्ये सध्या आनंदाची वातावरण पसरलेला आहे कारण महिलांना आता स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी निधी उपलब्ध होणार आहे.

ज्येष्ठ नागरिकांना दरमहा ₹६,००० मानधन आणि ₹५ लाखांचा मोफत उपचार; पाहा पात्रता व नियम Senior Citizen New Yojana

बांधकाम कामगारांना 12 हजार रुपये मिळणे सुरू; तुम्ही पात्र आहात का? चेक करा Bandhkam Kamgar Pension Yojana

Ladki Bahin Karj Yojana Apply

0 टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यासंदर्भात माहिती प्रवीण दरेकर यांनी दिलेली असून महिलांना सरकारच्या 4 महामंडळाच्या विविध योजनेच्या माध्यमातून हा व्याजाचा परतावा देखील देण्यात येणार आहे राज्य सरकारच्या चार महामंडळांनी योजना सुरू करण्यासाठी प्रतिसाद दिलेला असून यांच्या माध्यमातून 12% पर्यंत व्याजाचा परतावा हा परत मिळणार आहे. यामध्ये पर्यटन महामंडळाची आई योजना या योजनेच्या माध्यमातून 12 टक्क्यांपर्यंत व्याजाचा परतावा देण्यात येणार आहे. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, भटक्या विमुक्त साठी महामंडळ, ओबीसी महामंडळ या सर्व महामंडळाच्या माध्यमातून योजनेसाठी मोठ्या प्रमाणात तयारी सुरू करण्यात आली आहे.

त्यामुळे मुंबई बँकेकडून आता कर्जपुरवठा करण्यात येणार आहे परंतु बँकेकडून कर्ज घेणाऱ्या महिला या महामंडळाच्या लाभार्थी असल्यावर त्यांना याचा अजून देखील मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे असं प्रवीण दरेकर यांनी स्पष्टपणे माहिती दिली आहे.

मोफत भांडी वाटप योजना सुरू! पाहा पात्रता आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रिया येथे Bandhkam Kamgar Yojana 2026

महिलांना मुंबई बँकेकडून मिळणार 1 लाख रुपये बिनव्याजी कर्ज

  • मुंबई बँकेच्या माध्यमातून 0 टक्के व्याजदर आणि 1 लाख रुपये पर्यंतचा कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे या संबंधी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील केलेली होते. आणि त्यांच्यानंतर बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी देखील या संबंधी अधिक माहिती दिलेली आहे.
  • लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी पात्र महिला मुंबईमध्ये एकूण 12 ते 15 लाख दरम्यान आहेत. आणि यातील महिलांना देखील या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार आहे.
  • मुंबई बँकेच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे लाडकी बहिणींना आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी अधिक मदत मिळणार आहे. तसेच 0 टक्के व्याजदराने कर्ज मिळणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक पाठबळ मिळणार आहे.

Leave a Comment