Aai Business Loan 2026: महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत महिलांना उद्योग-व्यवसायात सक्षम करण्यासाठी ‘आई’ (महिला केंद्रित लिंग समावेशक पर्यटन धोरण) ही विशेष योजना राबवली जात आहे.
Business Loan 2026
पर्यटन क्षेत्रात महिला उद्योजकांची संख्या वाढवणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
Aai Business Loan documents
योजनेचे स्वरूप आणि प्रमुख वैशिष्ट्ये
- कर्ज मर्यादा: पर्यटन व्यवसायासाठी मान्यताप्राप्त बँकांकडून ₹१५ लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध.
- व्याजाची पूर्ण परतफेड: या कर्जावरील व्याजाची रक्कम (१२% च्या मर्यादेत) थेट शासनाकडून लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
- व्याज परताव्याची मर्यादा: व्याजाची ही सवलत खालीलपैकी जो पर्याय आधी पूर्ण होईल तोपर्यंत लागू राहील:
- कर्जाची पूर्ण परतफेड होईपर्यंत.
- जास्तीत जास्त ७ वर्षांच्या कालावधीसाठी.
- एकूण व्याज रक्कम ₹४.५० लाख होईपर्यंत.
- विमा संरक्षण: नोंदणीकृत सहल मार्गदर्शक, महिला वाहनचालक व कर्मचाऱ्यांना पहिल्या ५ वर्षांसाठी राज्य/केंद्र सरकारच्या विमा योजनेचा हप्ता शासनामर्फे भरला जाईल.
Aai Business Loan 2026 apply
या योजनेअंतर्गत कोणते व्यवसाय सुरू करता येतील?
महाराष्ट्र राज्यातील खालील पर्यटनविषयक व्यवसायांसाठी हे कर्ज मिळू शकते:
- निवास व भोजनाची सोय: होमस्टे, हॉटेल, रिसॉर्ट, मोटेल, रेस्टॉरंट, कॅफे, फास्ट फूड सेंटर, बेकरी, कॉमन किचन.
- पर्यटन सेवा: टूर अँड ट्रॅव्हल्स एजन्सी, गाईड/सहल मार्गदर्शक सेवा, टुरिस्ट ट्रान्सपोर्ट ऑपरेटर.
- विशेष पर्यटन प्रकल्प: कृषी पर्यटन केंद्र, निसर्ग/आदिवासी पर्यटन, मेडिकल व वेलनेस सेंटर (आयुर्वेद/योग), कॅरॅव्हॅन, हाऊसबोट, टेंट व ट्री हाऊस.
- इतर व्यवसाय: सोव्हेनिअर शॉप्स (भेटवस्तूंची दुकाने), आर्ट अँड क्राफ्ट व्हिलेज, इव्हेंट मॅनेजमेंट इत्यादी.
Aai Business Loan 2026 Low Cibil Score
पात्रतेचे निकष आणि अटी
- अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे.
- पर्यटन व्यवसाय हा पूर्णपणे महिलेच्या मालकीचा व त्यांनी चालवलेला असावा.
- व्यवसायातील किंवा हॉटेल/ट्रॅव्हल एजन्सीमधील किमान ५०% कर्मचारी महिला असणे बंधनकारक आहे.
- बँक खाते आधार कार्डशी लिंक असावे.
- कर्जाचे हप्ते वेळेवर भरणे आवश्यक आहे.
- तारण नसल्यास केंद्र सरकारच्या Credit Guarantee Scheme चा लाभ घेता येईल.
Aai Business Loan 2026 approval
आवश्यक कागदपत्रे (Documents Required)
- ओळख व पत्त्याचा पुरावा: आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदार ओळखपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स / पासपोर्ट.
- व्यवसायाशी संबंधित पुरावे:
- उद्योग नोंदणी प्रमाणपत्र
- महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नोंदणी (Shop Act)
- वीज बिल किंवा दूरध्वनी बिल
- अन्न व औषध प्रशासन (FDA) परवाना व GST नोंदणी (लागू असल्यास)
- व्यवसाय सुरू असल्याचे फोटो
- इतर पुरावे:
- ₹१०० च्या स्टॅम्प पेपरवर व्यवसाय स्वतःच्या मालकीचा असल्याचे प्रतिज्ञापत्र (Notarized Affidavit).
- बँक पासबुक / रद्द केलेला चेक (Cancelled Cheque).
- व्यवसायाचा ५०० शब्दांतील संकल्पना आराखडा (Project Report).
- ₹५० प्रक्रिया शुल्क भरल्याची पावती.
Aai Business Loan aadhar card
अर्ज कसा आणि कुठे करावा?
- पात्रता प्रमाणपत्र (Letter of Intent – LOI): सर्वप्रथम महिला अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज प्रादेशिक पर्यटन कार्यालयाकडे (नवी मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती किंवा नागपूर) सादर करावा.
- कर्ज मंजुरी: पर्यटन संचालनालयाकडून ‘Letter of Intent’ (LOI) मिळाल्यानंतर अधिकृत बँकेत कर्जासाठी अर्ज करावा.
- व्याज परतावा: बँक कर्ज मंजूर झाल्यानंतर आणि व्यवसाय सुरू झाल्यावर दरमहा भरलेल्या व्याजाचा परतावा शासन थेट खात्यात जमा करेल.
