Ladki Bahin Yojana June Installment List लाडक्या बहिणींना ‘जून’ चे 1500 रुपये या दिवशी मिळणार

Ladki Bahin Yojana June Installment List: लाडक्या बहिणींना, जून महिन्याचा हप्ता ( Ladki Bahin Yojana May Hapta )1500 रुपये कधी जमा होणार आहे. अशा प्रकारचा प्रश्न मोठ्या प्रमाणात विचारण्यात येत आहे. याबद्दल मे महिन्याचा हप्ता मिळण्यासाठी देखील खूप मोठ्या प्रमाणात उशीर झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळेच जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना वेळेवर मिळेल का? याबाबत संभ्रम महिलांमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे.

लाडक्या बहिणींना आता जून महिन्याचा हप्ता 1500 रुपये कधी मिळणार? याबाबत एक अपडेट समोर आलेले आहे. त्यानुसार जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे. याची माहिती देण्यात येत आहे. त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

Ladki Bahin Yojana June Installment List

लाडक्या बहिण योजनेतील पात्र महिलांना आतापर्यंत 11 हप्ते जमा करण्यात आलेले आहे. आणि आता जून महिन्याचा बारावा हप्ता मिळणार आहे. त्यामुळे सध्या बारावा हप्ता मिळण्याच्या प्रतीक्षेत महिला आहेत. करण जून महिन्याचे ( Ladki Bahin Yojana June Installment )देखील 15 दिवस ओलांडले आहेत.

योजना सुरू केल्यानंतर, सुरुवातीला प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या अथवा तिसऱ्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर 1500 रुपये जमा करण्यात येत होते. परंतु विधानसभा निवडणूक झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात या तारखांमध्ये दिरंगाई झाल्याचे पाहायला मिळते.

कर्जमाफी यादी जाहीर: यादीत तुमचे नाव आहे का? असे तपासा ऑनलाईन! Farmer Loan 2026

Ladki Bahin Yojana June Installment Date

जून महिन्याच्या हप्त्याच्या तारखे बद्दल सांगायचे झाल्यास महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले आहे की, लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता महिना अखेरीस जमा करण्यात येईल. यासाठी सरकारकडून सध्या तयारी करण्याचे काम सुरू आहे.

जून महिन्याचा हप्ता मिळण्यासाठी लाडक्या बहिणींना आता पुढच्या महिन्याची वाट पहावी लागणार नाही. कारण मे महिन्यामध्ये या योजनेच्या मे महिन्याच्या हप्तदरम्यान मोठ्या प्रमाणात तक्रार आली होती. मे महिन्यामध्ये सरकारी कर्मचारी महिला या लाडक्या बहिण योजनेच्या अटींची उल्लंघन करून लाभ घेत असल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे मागील महिन्याचा हप्ता जमा होण्यासाठी उशीर झाल्याचे पाहायला मिळाले होते. परंतु यापुढे असे होणार नाही. मे महिन्याचा हप्ता हा देखील उशीर झाल्यामुळे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा करण्यात आलेला होता.

Ladki Bahin Yojana May Hapta Date

लाडकी बहीण योजना पुढील हप्ता मिळण्यासाठी पडताळणी प्रक्रिया सुरू आहे का?

लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत सरकारी कर्मचारी महिला या निकषांचे उल्लंघन करून देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याचे पुढे आलेले होते. त्यानंतर उर्वरित 8 लाख सरकारी कर्मचारी महिलांच्या अर्जाची पडताळणी करणे बाकी असल्याची माहिती देण्यात आलेली होती. त्यामुळे सध्या ज्या महिला योजनेच्या अटी तसेच निकषांमध्ये बसत नाहीत. त्यांना आता या योजनेचे माध्यमातून बाद केले जात आहे. आणि या महिलांना यापुढे कोणताही हप्ता मिळणार नाही.(Ladki Bahin Yojana June Installment List)

लेक लाडकी योजना: मुलींना मिळणार १,०१,००० रुपये; असा करा अर्ज! Lek Ladaki Yojana 2026

राज्यामधील संजय गांधी निराधार योजने आणि अन्य पेन्शनधारक योजना, चार चाकी वाहन धारक असणाऱ्या महिला, आयकर भरणाऱ्या महिला, अशा प्रकारच्या महिलांना विविध निकषाद्वारे अपात्र ठरविण्यात आल्यामुळे यापुढे हप्ता मिळणार नाही.

लाडकी बहीण योजनेचा हप्ता चेक करण्यासाठी अधिकृत वेबसाईट: https://ladakibahin.maharashtra.gov.in/

रेशनकार्ड शेवटची संधी; घरबसल्या केवायसी अशी करा Ration Card E-KYC

3 thoughts on “Ladki Bahin Yojana June Installment List लाडक्या बहिणींना ‘जून’ चे 1500 रुपये या दिवशी मिळणार”

Leave a Comment