1880 सालापासूनचे जुने सातबारा, फेरफार व खाते उतारे पहा आपल्या मोबाईल वर Land Record Satbara Online

Land Record Satbara Online: जमिनीची खरेदी-विक्री असो किंवा कोणताही कायदेशीर व्यवहार, त्या जमिनीचा ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि मालकी हक्कांचा इतिहास माहीत असणे अत्यंत महत्त्वाचे असते. मूळ जमीन कोणाची होती आणि काळानुसार त्यात काय फेरबदल झाले, ही माहिती मिळवण्यासाठी पूर्वी तहसील किंवा भूमी अभिलेख कार्यालयाचे खेटे मारावे लागत असत.

परंतु आता महाराष्ट्र शासनाने ‘ई-अभिलेख’ (e-Records) या डिजिटल उपक्रमांतर्गत १८८० सालापासूनचे जुने दस्तऐवज ऑनलाईन उपलब्ध करून दिले आहेत.

ई-अभिलेख योजना म्हणजे काय?

‘ई-अभिलेख’ या उपक्रमांतर्गत राज्यातील सुमारे ३० कोटी जुने अभिलेख उतारे संगणकीकृत करून ऑनलाईन उपलब्ध केले जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांना व नागरिकांना १८८० सालापासूनचे जुने सातबारा, फेरफार पत्रक आणि खाते उतारे डिजिटल स्वरूपात पाहता व डाऊनलोड करता येणार आहेत.

सातबारा उतारा ऑनलाइन मोबाइल से फ्री में कैसे डाउनलोड करें? Land Record
सातबारा उतारा ऑनलाइन मोबाइल से फ्री में कैसे डाउनलोड करें? Land Record

सुविधा उपलब्ध असलेले १९ जिल्हे:

पूर्वी ही सोय केवळ ७ जिल्ह्यांपुरती मर्यादित होती. आता राज्यातील खालील १९ जिल्ह्यांमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली आहे:

अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, लातूर, मुंबई उपनगर, नंदुरबार, नाशिक, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, वाशीम आणि यवतमाळ.

💻 ऑनलाईन जुने अभिलेख कसे पाहायचे? (स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया)

जुने फेरफार किंवा सातबारा डाऊनलोड करण्यासाठी खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा:

१८८० सालापासूनचे जुने खाते उतारे आणि जमिनीची माहिती आता घरबसल्या मोबाईलवर पहा Old Land Records
१८८० सालापासूनचे जुने खाते उतारे आणि जमिनीची माहिती आता घरबसल्या मोबाईलवर पहा Old Land Records

पायरी १: वेबसाईटला भेट द्या व नोंदणी करा

  1. सर्वात आधी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला aapleabhilekh.mahabhumi.gov.in भेट द्या.
  2. होमपेजवर “e-Records (Archived Documents)” या पर्यायावर क्लिक करा.
  3. भाषा ‘मराठी’ निवडा.
  4. जर तुम्ही नवीन वापरकर्ते असाल, तर “नवीन वापरकर्ता नोंदणी” (New User Registration) वर क्लिक करा.
  5. अर्जात तुमचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल, पत्ता ही माहिती भरून लॉग-इन आयडी आणि पासवर्ड तयार करा.

पायरी २: दस्तऐवज शोधा व डाऊनलोड करा

  1. तुमच्या आयडी आणि पासवर्डने लॉग-इन (Log-in) करा.
  2. तुमचा जिल्हा, तालुका, गाव आणि तुम्हाला हव्या असलेल्या “अभिलेखाचा प्रकार” (उदा. फेरफार, सातबारा, खाते उतारा) निवडा.
  3. तुमचा गट क्रमांक / सर्व्हे नंबर प्रविष्ट करा आणि “शोधा” बटणावर क्लिक करा.
  4. स्क्रीनवर संबंधित वर्षाचा जुना अभिलेख दिसेल.
  5. आवश्यक तो उतारा निवडून डाऊनलोड (Download) करून सेव्ह करा.

Leave a Comment