Ladki Bahin Yojana May Installment list: लाडक्या बहिणींना ‘मे’ महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार? नवीन अपडेट

Ladki Bahin Yojana May Installment List: राज्याची महत्त्वाकांशी योजना “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने” ( Ladki Bahin Yojana)चा हप्ता 1500 रुपये कधी जमा होणार? याबाबत आधी तटकरे यांनी स्वतः माहिती दिलेली आहे. राज्यभरातील अनेक महिलांकडून मे महिन्याचे 1500 रुपये कधी जमा होणार? अशा प्रकारचा सवाल करण्यात येत आहे यावरती उत्तर म्हणून राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ‘मे’ महिन्याच्या हप्त्यासाठी होणाऱ्या विलंबनाविषयी स्पष्टीकरण दिलेले आहे. (Ladki Bahin Yojana May Installment list)

मे महिना ओलांडून गेलेला आहे तरीदेखील अजूनही लाडक्या बहिणींना मे महिन्याचे 1500 रुपये जमा करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे महिला विचारत आहेत की दोन्ही महिन्याचे एकत्रितरित्या 3 हजार रुपये मिळणार आहेत की काय? याविषयी माहिती जाणून घेऊया. लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याकडे राज्यातील महिलांचे लक्ष लागलेले असतानाच लाडकी बहीण बाबत अदिती तटकरे यांनी नवीन माहिती दिलेली आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडके बहिणीबरोबर स्वतः अपडेट दिलेली आहे. त्यांनी स्वतः वृत्तवाहिनी आणि पत्रकारांशी बोलत असताना सांगितलेले आहे की लाडक्या बहिणीचे पैसे लवकरच जमा करण्यात येतील. त्यामुळे राज्यभरातील लाखो महिलांना दिलासा मिळालेला आहे.

Ladki Bahin Yojana May Installment list: लाडक्या बहिणींना ‘मे’ महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार?

  • राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार (Ajit Pawar)यांनी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लडकी बहिणी योजनेच्या हा त्याच्या फाईलवर सही करत असल्याची माहिती दिलेली होती.
  • अशी माहिती दिली असताना देखील मे महिन्याचा हप्ता अजून देखील लाडक्या बहिणींना जमा करण्यात आलेला नाही.
  • पण लवकरच महिलांना मे महिन्याचा हप्ता जमा करण्यात येणार आहे अशी माहिती देण्याकडून देण्यात येत आहे.
  • जून महिन्यामध्ये वटपौर्णिमा सणाचा निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यातील महिलांना मे आणि जून दोन्ही महिन्याचे पैसे एकत्रित 3 हजार रुपये मिळू शकतात अशी माहिती देखील देण्यात येत आहे.
  • मात्र दोन्ही हप्त एकत्रित मिळणार का? याबाबत कोणती अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
  • आतापर्यंत महिलांना एकूण दहा हप्ते जमा झाले आहेत आणि दहावा हप्ता 2 मे 2025 पर्यंत जमा करण्यात आला आहे.

पी एम किसान योजनेचे 2000 रुपये; 20 वा हप्ता या दिवशी जमा होणार, यादीत नाव चेक करा PM Kisan Yojana 20 th Installment List

2619 पदांची मेगाभरती सुरू; जाणून घ्या पात्रता आणि संपूर्ण वेळापत्रक MPSC Group C Recruitment 2026

पत्रकारांसोबत संवाद साधत असताना आदित तटकरे यांनी हत्या विषयी महत्वाची माहिती दिलेली आहे. लाडक्या बहिणींचा गैरसमज होत आहे. लाडकी बहीण योजना ही राज्यातील पात्र महिलांसाठी कायमस्वरूपी सुरू राहणार आहे. या अगोदरच्या मागच्या 4 महिन्यांपूर्वीच्या तपासणीमध्ये लक्षात आलेले होतं कि, राज्यातील सरकारी कर्मचारी महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. तेव्हापासूनच त्यांना याला पासून वगळण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली होती. अजून देखील एकूण 8 लाख महिलांच्या अर्जाची तपासणी बाकी आहे. यानंतर ज्या महिला सरकारी कर्मचारी असतील त्यांना या योजनेच्या माध्यमातून वगळण्यात येणार आहे ही प्रक्रिया ( जून 2025 मध्ये ) पार पाडले जाईल.

आदिती तटकरे मे 2025 हप्त्याविषयी स्पष्टीकरण

पत्रकारांशी संवाद साधत असताना आधी तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. की लवकरच लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता जमा करण्यात येणार आहे.

लाडकी बहीण योजना यादी पाहण्यासाठी वेबसाईट: https://ladakibahin.maharashtra.gov.in/

कर्जमाफीसाठी ही 3 कागदपत्रे बँकेत द्यावी लागणार, अन्यथा नाव यादीतून कट होणार? Farmer Loan

लाडकी योजनेची पात्रता काय?

  1. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 2025 मध्ये महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये जमा करण्यात येत आहेत.
  2. यासाठी राज्यभरातील 21 ते 65 वयोगटातल महिला पात्र आहेत.
  3. लाडकी बहिण योजनेचा घेण्यासाठी राज्यभरातील विवाहित, विधवा, घटस्फोट झालेल्या महिला, तसेच निराधार महिला, या महिला पात्र असून यांच्यासोबतच वार्षिक उत्पन्न हे देखील 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणाऱ्या कुटुंबांमधील महिलांना या योजनेचा लाभ मिळतो आहे.
  4. लाभ घेण्यासाठी महिलाही महाराष्ट्र राज्याचीच रहिवासी असणे आवश्यक आहे.
  5. महिलांकडे जर चार चाकी गाड्या ( ट्रॅक्टर वगळता) असतील तर अशा महिलांना लाभ दिला जात नाही.
  6. कुटुंबामध्ये जर महिला स्वतः किंवा कुटुंबातील इतर व्यक्ती सरकारी नोकरीला असेल तर लाभ घेता येत नाही.
  7. ज्या व्यक्ती आयकर भरीत आहे त्या देखील या लाडकी बहिणी योजनेसाठी पात्र नाहीत.

Leave a Comment