HSRP Number Plate Last Date: वाहन धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती, तुम्ही अजून देखील ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ ( High Security Registration ) लावलेली नसेल तर तुमच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे. आणि नंबर प्लेट बसवण्यासाठी ही शेवटची संधी आहे. आता यापुढे कोणत्याही प्रकारे मुदत वाढवण्यात येणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर आपली एचएसआरपी ( HSRP) नंबर प्लेट बसवणे गरजेचे आहे.
HSRP Number Plate Last Date
राज्य सरकारकडून एच एस आर पी ( HSRP) नंबर प्लेट बसवण्यासाठी 30 जून 2025 ही अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. राज्यभरातील ज्या वाहनांची नोंद ही 1 एप्रिल 2019 पूर्वी करण्यात आलेली आहे. अशा वाहनधारकांना आता 30 जून 2025 पर्यंत आपल्या गाड्यांना HSRP Number Plate बसवण्यासाठी शेवटची तारीख देण्यात आलेली होती. यानंतर कोणत्याही प्रकारची संधी देण्यात येणार नाही. या अगोदर सरकारकडून 31 मार्च 2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली होती. परंतु यावेळी असे आढळले होते. की अनेक वाहने ही विना एचएसआरपी नंबर प्लेट वापरली जात आहे. त्यामुळे पुन्हा तारीख वाढवून 30 एप्रिल 2025 केलेली होती. ( HSRP Number Plate Last Date )
पुन्हा एकदा यामध्ये बदल करुन एचएसआरपी ( HSRP) नंबर प्लेट बसवण्यासाठी अंतिम तारीख ही 30 जून 2025 करण्यात आलेली आहे. राज्यात वाहनधारकांकडून येथील HSRP नंबर प्लेट बसविण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याकारणाने सरकारकडून अनेक वेळा यामध्ये कालावधी वाढवून दिलेला होता. पण आता अंतिम तारीख( HSRP Number Plate Last Date) 30 जून 2025 करण्यात आलेली आहे. याची नोंद घेणे गरजेचे आहे कारण यानंतर कोणत्याही प्रकारे तारीख वाढवून मिळणार नाही.
गाड्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून HSRP (एचएसआरपी) नंबर प्लेट नसलेल्या वाहनांना किंवा नोंदणी न केलेल्या वाहनांना प्रादेशिक परिवहन विभागाकडून ( RTO) नूतनीकरणावेळी सेवा पुरवली जाणार नाही. अशा प्रकारचे निर्णयामुळे वाहनधारकांना मोठा फटका बसणार आहे.
एचएसआरपी ( HSRP) नियम कोणत्या वाहनांना?
- एक एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना एचएसआरपी ( HSRP) बसवणे बंधनकारक आहे.
- 30 जून 2025 पर्यंत ( HSRP Number Plate Last Date) तुम्ही जर आपल्या वाहनांना याचे सारखे बसवली नाही तर अतिरिक्त दंड लावण्यात येणार आहे.
- या व्यतिरिक्त सरकारकडून फॅन्सी नंबर प्लेट ह्या पूर्णपणे बेकायदेशीर मानण्यात येणार आहेत.
- एच एस आर पी बसवण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडून नवीन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे तो पाहणे गरजेचे आहे.
- एच एस आर पी नंबर प्लेट ही एक विशेष सुरक्षा युक्त अशी नंबर प्लेट आहे.
- यामध्ये प्लेटवर दहा अंकी येऊनी लेझर ब्रांडेड आयडी नंबर लेझरच्या माध्यमातून कोरलेला असतो.
- यामुळे आता कोणत्याही वाहनांची छेडछाड करणे शक्य होत नाही किंवा चोरीस गेलेले वाहन शोधण्यासाठी देखील याचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो.
- ही प्लेट ॲल्युमिनियम धातूपासून बनलेली आहे. नंबर प्लेट वरती IND अशाप्रकारे लिहिलेले आहे. यावरती अशोक चक्राचे होलोग्राफ हॉटस्पॉट केलेले आहेत.
- याव्यतिरिक्त नंबर प्लेटवर एक रिफ्लेक्ट फिल्म असते, यावरती स्पष्टपणे ‘INDIA’ असे नमूद केलेले आहे. जे की रात्रीच्या वेळी स्पष्ट दिसत आहे
वाहनांना ही नंबर प्लेट कशी बसवायची? याची माहिती नसल्याने लोक मोठ्या प्रमाणात याकडे दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळत आहे. पश्चिम महाराष्ट्र वगळता इतर जिल्ह्यांमध्ये नंबर प्लेट बसवण्यासाठी प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु आता परिवहन आयुक्तांनी राज्यातील सर्व परिवहन कार्यालयांना (RTO Office) ला सूचना केलेल्या आहेत की ज्या वाहनांना 30 जून 2025 नंतर एचएसआरपी नंबर प्लेट दिसणार नाही त्यांच्या कारवाई करण्यात यावी.
एचएसआरपी (HSRP) अर्ज प्रक्रिया कशी आहे?
- एचएसआरपी( HSRP ) नंबर प्लेट अर्ज करण्यासाठी https://transport.maharashtra.gov.in/ या शासकीय संकेतस्थळाला भेट द्यायची आहे.
- या अधिकृत वेबसाईटला भेट दिल्यानंतर तुम्हाला वरती उजव्या कोपऱ्यात ‘एचएसआरपी ब्लाॉक’ HSRP BLOCK दिसतो त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नवीन विंडो ओपन होते. यामध्ये सर्व कार्यालयाची नावे दिसून येतात.
- आपण ज्या ठिकाणी आहात तेथील कार्यालयात निवडायचे आहे.
- यानंतर तुम्हाला आपल्या जवळ असलेल्या आरसी वरून रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा व यानंतर चेसेस नंबर, इंजिन नंबर चे शेवटचे पाच आकडे टाकायचे आणि आपला मोबाईल क्रमांक टाकायचा. यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं.
- यानंतर ‘कॅपचा कोड’ भरल्यावर नवीन पेज ओपन होते या ठिकाणी तुम्हाला वाहना धारकांचे नाव दिसते.
- यानंतर तुम्हाला एचएसआरपी चे शुल्क भरण्यासाठी पेज ओपन होते. येथे तुम्हाला किंवा कोड स्कॅन करून पेमेंट करता येत आहे. हे प्रत्येक वाहनानुसार वेगवेगळे असे शुल्क सरकारकडून निर्धारित करण्यात आलेले आहेत.
- तुमच्याकडे जरी 1) दुचाकी वाहन असेल तर 450 + 18% GST अशाप्रकारे एकूण 531 रुपये, 2) चारचाकी आणि जड वाहनांसाठी 745 +18% जीएसटी 3) तीन चाकी वाहनांसाठी 500+18% जीएसटी असे शुल्क ठरविण्यात आलेले आहे.
- तुम्ही शुल्क भरल्यानंतर मोबाईल नंबर वर ओटीपी ( One Time Password) येतो. यानंतर तुम्हाला ‘होम डिलिव्हरी’ पाहिजे आहे. की सेंटर ला जाऊन नंबर प्लेट बसवायचे आहे यासाठी पर्याय विचारले जातात.
- तुम्हाला HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी तारीख आणि वेळ देण्यात येते.
- याची एक पावती तयार होऊन ती तुम्हाला रजिस्टर मोबाईल नंबर वर पाठवण्यात येते.(HSRP Number Plate Last Date)
15 जून पासून शाळांचे वेळापत्रकात मोठा बदल; नवीन वेळापत्रक Maharashtra School New Timetable 2025