घरकुल योजना अर्ज सुरू: असा करा अर्ज! जाणून घ्या पात्रता, कागदपत्रे आणि मिळणारे अनुदान

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत घरकुल २०२६ साठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असून ही शेवटची संधी आहे. ग्रामीण भागातील बेघर व कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबांना पक्के घर बांधण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते.

लाडकी बहीण योजना सप्टेंबर हप्ता 1500 रूपये कधी जमा होणार? जाणून घ्या Ladki Bahin Yojana Personal

घरकुल अर्ज कसा व कुठे करावा? (Step-by-Step)

  1. फॉर्म मिळवणे: तुमच्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयातून घरकुल अर्जाचा नमुना मिळवा.
  2. माहिती भरणे: अर्जात ग्रामपंचायतीचे नाव, तालुका, जिल्हा आणि अर्जदाराचे पूर्ण नाव, पत्नीचे नाव, कुटुंबातील सदस्यांचा तपशील (वय, व्यवसाय, नाते) अचूक भरा.
  3. विषय लिहा: “प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) नवीन घरकुल यादीत नाव समाविष्ट करण्याबाबत अर्ज.”
  4. अर्ज जमा करणे: भरलेला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे ग्रामसेवक, सरपंच किंवा ग्रामपंचायत प्रशासकाकडे जमा करून पोचपावती घ्या.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक (आधार सीडेड / DBT ॲक्टिव्ह)
  • मनरेगा जॉब कार्ड (MGNREGA)
  • रेशन कार्ड
  • सध्याच्या कच्च्या घराचे / झोपडीचे फोटो

योजनेअंतर्गत किती व कशी मदत मिळते?

घरकुल बांधकामासाठी लाभार्थ्याला विविध टप्प्यांत एकूण सुमारे ₹२,१०,००० पर्यंतची मदत मिळते:

गुंठेवारी जमीन खरेदी-विक्रीचे नियम बदलले? 1 ते 5 गुंठे जमीन घेण्यापूर्वी सातबारा हे नियम पहा! Land Record Satbara Online 2026
  • केंद्र सरकारचे अनुदान: ₹१,२०,०००
  • राज्य सरकारचे अतिरिक्त अनुदान: ₹५०,०००
  • मनरेगा (रोजगार हमी) मजुरी: सुमारे ₹३०,००० ते ₹३५,०००
  • स्वच्छ भारत मिशन (शौचालय): ₹१२,०००
  • सोलर सिस्टीम अनुदान: ₹१५,०००

महत्त्वाचा नियम: वडिलांना घर मिळाले असल्यास मुलाला लाभ मिळेल का?

  • होय, लाभ मिळू शकतो. जर मुलाचे लग्न झाले असेल, तर रेशन कार्ड एकच असले तरी त्याचे कुटुंब स्वतंत्र मानले जाते. त्यामुळे आई-वडिलांना आधी लाभ मिळाला असला तरी विवाहित मुलगा स्वतंत्र घरकुलासाठी अर्ज करू शकतो.

Leave a Comment