फार्मर आयडी कार्ड गावानुसार यादी जाहीर; नाव चेक करा Farmer Id Card List

Farmer Id Card List: फार्मर आयडी कार्ड सध्या अनेक योजनांसाठी मागितली जात आहे तसेच ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना’ आणि ‘नमो शेतकरी योजना’ या योजनांसाठी देखील फार्मर आयडी कार्ड ची गरज भासत आहे त्यामुळे राज्यभरात अनेक शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळालेला असून याची यादी कशा चेक करायची?आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. राज्यातील अनेक शेतकऱ्यांना आता फार्मर आयडी कार्ड साठी नोंदणी केलेली असून त्यांना युनिक आयडी मंजूर झाल्याचे संदेश मिळू लागलेले आहेत त्यामुळे शेतकरी आयडी (Farmer Id Card ) यादी डाऊनलोड करून आपले नाव कशा चेक करायचे? यासाठी शेतकऱ्यांकडून विचारणा करण्यात येत होती. चला तर मग ही संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊयात.

फार्मर आयडी ( Farmer Id Card ) म्हणजे काय?

राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने ॲग्रीस्टॉक ( Agristock Scheme ) अंतर्गत फार्मर आयडी कार्ड मंजूर करण्यात आलेले आहेत. या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी खूप मोठे फायदे होणार आहेत त्यामध्ये जमिनीची माहिती, बाजार भाव, पिकाची उत्पन्न, पिकावरील रोग आणि त्यावरील आवश्यक माहिती, डिजिटलायझेशन आणि जमीन मालकांशी संबंधित असणारी सर्व माहिती, अशा प्रकारची इ. माहिती शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. या फॉर्मल आयडी कार्ड च्या माध्यमातून शेतकरी राज्यातील विविध सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकतात पीएम किसान सारखे योजना चा पुढील हप्ता मिळण्यासाठी तर बंधनकारक करण्यात आलेले आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप 👉 येथे क्लिक करा

फार्मर आयडी कार्ड स्टेटस कसे चेक करायचे? Farmer Id Card List

  • फार्मर आयडी कार्ड ( Farmer Id Card List) स्टेटस चेक करण्यासाठी या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
  • त्यानंतर येथे तुमचा आधार कार्ड नंबर टाकावा. व त्यानंतर तुम्ही नोंदणी आधीच केलेली असेल तर तुमचा आधार कार्ड नंबर टाकून तुम्ही सबमिट ( submit) या बटनावर क्लिक करायचे आहे.
  • स्क्रीनवर तुम्हाला लगेच तुमच्या नोंदणीची सर्व माहिती उपलब्ध होते.
  • युनिक फॉर्मर आयडी तपासा: स्क्रीनवर तुम्हाला युनिक फार्मर आयडी क्रमांक दिसतो सध्या यामध्ये दुरुस्तीचा पर्याय सरकारकडून उपलब्ध करून देण्यात आलेला नाही त्यामुळे तुम्ही नोंदणी करताना जी माहिती दिलेली आहे ती तुम्हाला दिसते.

हे पण वाचा 👉 महिलांना मोफत पिठाची गिरणी मिळणार; अर्ज सुरू, येथे करा अर्ज! Free Flour Mill Apply

फॉर्म आयडी कार्ड ( Farmer Id Card List ) डाउनलोड कसे करायचे?

  • प्रथम फार्मर आयडी कार्ड या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. येथील लॉगिन करताना तुमचा आधार कार्ड नंबर चा वापर करा.
  • ’माहिती पहा’ View Details हा पहिल्या दिसतो त्यावरती क्लिक करावे.
  • यानंतर तुम्हाला तुमची आयडी कार्ड पाहता येईल. तुमची प्रोफाइल ची सर्व माहिती तुम्हाला पाहायला मिळेल.
  • पीडीएफ (Farmer Id Card PDF ) डाउनलोड करावी: वरील बाजूला तुम्हाला Generate PDF या पर्याय यावर क्लिक करायचे आहे आणि तुमचे आयडी कार्ड डाउनलोड करायचे आहे तुम्ही त्याची प्रिंट देखील काढू शकतात.

फार्मर आयडी कार्ड ( शेतकरी ओळखपत्र) फायदा काय?

सरकारी योजना तसेच अनुदान आणि कर्ज च सुविधा प्रक्रिया सोपी होण्यास मदत होईल.

पिक विमा संबंधी अपडेट तसेच बाजार भाव, जमीन मालकीची खात्रीशीर माहिती घरबसल्या मिळेल तसेच शेती संबंधित तज्ञांचे मार्गदर्शन मिळेल. पिकाची सर्व माहिती मिळेल. हमीभाव आणि बाजारभाव अशी सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.

डिजिटल शेती व्यवस्थापनाला याच्या माध्यमातून चालना मिळणार आहे.

फार्मर आयडी काढून तुम्ही अशा प्रकारे सर्व लाभ मिळवू शकता त्यामुळे लवकरात लवकर आपले फार्मर आयडी कार्ड काढणे देखील महत्त्वाचे आहे. अन्यथा तुम्हाला “पीएम किसान योजना” नमो शेतकरी योजना यांचा हप्ता जमा होण्यासाठी अडचणी येऊ शकतात अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आलेली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप 👉 येथे क्लिक करा

या कामगारांना 12 हजार रुपये पेन्शन मिळणार; अर्ज कसा करावा पहा Bandhkam Kamgar Yojana Pension List

Leave a Comment