हेक्टरी 20 हजार अनुदान जमा होण्यास सुरुवात; आले का? चेक करा Farmer Bonus Anudan List Maharashtra

Farmer Bonus Anudan List: 2024 मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टरला 20 हजार रुपये धानाचा बोनस जाहीर करण्यात आलेला होता. ज्यामुळे राज्यामधील पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 40 हजार रुपयांपर्यंत बोनस देण्यात येणार आहे. या योजनेसाठी एकूण 1800 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.

Farmer Bonus Anudan List Maharashtra

राज्यातील आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशन मध्ये नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना हा बोनस देण्यात येणार आहे. बोनस वितरणामध्ये मोठा घोटाळा झाल्यामुळे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा तपासणी करण्यासाठी काही कालावधी गेलेला होता. त्यामुळे हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खातेवर जमा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उशीर झालेला पाहायला मिळतो आहे. शेतकऱ्यांकडून देखील खूप मोठ्या प्रमाणात याबद्दल प्रश्न विचारण्यात येत होते. विधानसभेमध्ये देखील यावर खूप वेळा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता. मात्र हा निधी जमा होण्या साठी मोठा कालावधी गेलेला असला तरी देखील हा निधी आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हस्तांतरित करण्यात येत आहे.

Farmer Bonus Anudan List

17 जून 2025 पासून या निधीचे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्यास सुरुवात झालेली असून राज्यातील गोंदिया भंडारा नाशिक या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रथम टप्प्यात जमा करण्यास सुरुवात झालेली आहे. उर्वरित जिल्ह्याची रक्कम या जिल्ह्याच्या नंतर जमा करण्यात येणार असल्याची माहिती सध्या वृत्तवाहिन्यावर देण्यात आलेली आहे.

कर्जमाफी यादी जाहीर: यादीत तुमचे नाव आहे का? असे तपासा ऑनलाईन! Farmer Loan 2026

Ladki Bahin Yojana June Installment List लाडक्या बहिणींना ‘जून’ चे 1500 रुपये या दिवशी मिळणार

प्रतिहेक्टरी 20 हजार रुपये; दोन हेक्टर साठी 40 हजार रुपये मिळणार

सध्या राज्यांमधील खरीप हंगामाची मोठ्या प्रमाणात तयारी झालेली आहे शेतकऱ्यांना असे वाटत होते की, पेरणी अगोदर हे पैसे बँक खात्यावर जमा करण्यात येतील. परंतु असे न झाल्याने शेतकऱ्यांनी देखील याबाबत अनेक वेळा विचारणा केलेली होती. कारण शेतकऱ्यांना बी बियाणे, खते खरेदी करण्यासाठी तसेच शेतीची इतर कामे करण्यासाठी निधीची आवश्यकता होती. मात्र हा निधी 15 दिवस अगोदर बँक खात्यावर जमा करण्यात आला असता तर याचा प्रत्यक्षपणे फायदा हा शेतकऱ्यांना महत्त्वाच्या कामासाठी झाला असता. आणि आता मिळत असलेल्या निधीमुळे देखील शेतकऱ्यांना निश्चितच मोठा आधार मिळणार आहे. प्रदीर्घ प्रतीक्षा नंतर का होईना हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

लेक लाडकी योजना: मुलींना मिळणार १,०१,००० रुपये; असा करा अर्ज! Lek Ladaki Yojana 2026

Leave a Comment