आधारकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी, सरकारचा नवीन निर्णय Aadhar Card Update

Aadhar Card Update: सर्व आधार कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी आहे. सरकारने आधार कार्ड धारकांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतलेला आहे. याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आधार कार्ड हा देशभरातील तसेच राज्यातील सर्व नागरिकांसाठी एक सर्वात महत्त्वाचा पुरावा मानला जातो. आधार कार्ड हा राष्ट्रीय तत्व असणार एक महत्त्वपूर्ण पुरावा आहे. कारण आधार कार्ड वरती आपले नाव, पत्ता, याप्रकारे सर्व माहिती नमूद केलेली असते. तसेच आपल्याला आधार कार्ड च्या माध्यमातून सर्व सरकारी योजनांचा लाभ मिळवता येतो. आणि कोणतेही बँक व्यवहार करणे किंवा बँक खाते उघडण्यासाठी देखील आधार कार्ड हे सर्वात महत्त्वपूर्ण पुरावा म्हटलं जातो. अशाप्रकारे आधार कार्ड बाबत सरकारकडून वेळोवेळी वेगवेगळ्या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात येत असतात त्याबद्दल ही बातमी सविस्तर पाहूयात.

Aadhar Card Update आधारकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी

Aadhar Card Update: मित्रांनो तुमचा आधार कार्ड काढून जर 10 वर्षे पूर्ण झालेली असतील आणि तुम्ही जर आपल्या आधार कार्ड अपडेट केले नसेल, तर अशी माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया ( UIDAI ) कडून आधार कार्ड बाबत नवीन अधिसूचना जाहीर केलेली आहे. ज्यामध्ये देशभरातील सर्व आधार कार्ड धारकांना त्यांच्या आधार कार्ड मधील सर्व माहिती अपडेट करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कारण जर 10 वर्षे उलटून देखील आधार कार्ड अपडेट केलं नसेल, तर अनेक सरकारी योजनांचा लाभ तसेच इतर सेवा मिळवण्यासाठी देखील अडचणी येऊ शकतात.

कोणत्याही कामासाठी आधार कार्ड हा एक सर्वात महत्त्वाचं ओळखपत्र मानण्यात येत आहे. व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी तसेच सरकारी किंवा खाजगी संस्थांकडून ओळख सिद्ध करण्यासाठी देखील आधार कार्डचा वापर करण्यात येत असतो. यावरती जसे की व्यक्तीची वैयक्तिक माहिती, नाव, जन्मतारीख, पत्ता, मोबाईल नंबर अशा प्रकार ची माहिती असते. तसेच आधार नंबर याच्या मार्फत पुरवण्यात येतो. आणि तसेच बायोमेट्रिक ( Biometric) माहिती मध्ये– फिंगरप्रिंट, डोळ्याची स्कॅनिंग, फोटो इत्यादींचा समावेश असतो. यामध्ये तुमची बायोमेट्रिक माहिती कालबाह्य किंवा अपूर्ण असल्यावर आधार पडताळणीसाठी अडचणी येऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला आधार अपडेट करणे खूप महत्त्वाचे आहे.

जर आपले आधार कार्ड वेळेवर अपडेट करत नसाल तर याचे परिणाम हे प्रत्यक्ष देखील पाहायला मिळतात उदाहरणार्थ, १) रेशन कार्ड वर स्वस्त धान्य मिळते ही सोय बंद होऊ शकते. २) एलपीजी गॅस सिलेंडर सबसिडी थांबू शकतात.३) आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक असल्यावर डीबीटी ( Direct Benifits Transfer) मार्फत सरकारी योजनांचा लाभ मिळत असल्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. ४) पी एम किसान योजना, नमो शेतकरी योजना, सरकारचे विविध पेन्शन योजना, आरोग्य योजना आणि इतर सर्व सहकारी योजनांसाठी पडताळणीसाठी अडचणी येऊ शकतात. यामुळे आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक आवश्यक आहेत.

आधार कार्ड अपडेट करण्यासाठीची ही प्रक्रिया आता अगदी सोपी आणि सुलभ करण्यात आलेली आहे. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी नागरिक जवळच्या आधार केंद्रात जाऊन किंवा UIDAI चा ( https://uidai.gov.in/ )अधिकृत वेबसाईटला भेट देऊन देखील स्वतःचे आधार कार्ड अपडेट करू शकतात. आधार कार्ड अपडेट करण्याची ही सेवा सध्या काही काळासाठी मोफत देखील पुरवण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी या संधीचा लाभ घेणे आवश्यक आहे. आपले आधार अपडेट करत असताना ओळख सिद्ध करण्यासाठी पत्त्याची पुरावे आवश्यक आहे. उदाहरणार्थ बँक पासबुक, मतदान ओळखपत्र, विज बिल गॅस बिल स्लिप, पॅन कार्ड अशा प्रकारचा वापर यासाठी होऊ शकतो.

UIDAI ने (Unique Identification Authority of India) सांगितले आहे. की, कोणतेही व्यक्तीच्या आधार नोंदणीला जर 10 वर्ष पेक्षा अधिक काळ उलटला असेल तर त्यांनी अजून देखील आपले डेमोग्राफिक किंवा बायोमेट्रिक अपडेट केलेले नसेल तर लवकरात लवकर आपले आधार कार्ड अपडेट करावेत. आणि हे अपडेट करत असताना दोन घटक अपडेट करणे यामध्ये ओळख आणि पत्ता असे दोन घटक अपडेट करावेत. आणि बायोमेट्रिक अपडेट हे देखील तुम्ही या वेळेस अपडेट करू शकतात. जर तुमची बायोमेट्रिक पडताळणी अयशस्वी दाखवत असेल असल्यावर. आपले आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्ही या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.

पीएम किसान योजना 2000 रुपये मिळण्यासाठी हे काम करा PM Kisan Yojana List

Leave a Comment