रेशनकार्ड शेवटची संधी; घरबसल्या केवायसी अशी करा Ration Card E-KYC

Ration Card E-KYC: देशभरातील मोफत धान्य आणि इतर रेशनचा लाभ घेत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. रेशन कार्डधारकांना आपली ई-केवायसी ( Ration Card E-KYC ) करण्याची शेवटची संधी देण्यात आली आहे. ही अंतिम तारीख 30 जून 2025 पर्यंत देण्यात आलेली आहे. या तारखेपर्यंत आपली ई-केवायसी पूर्ण करावी लागणार आहे. तुम्ही जर 30 जून 2025 पर्यंत आपली ई-केवायसी पूर्ण केली नाही तर यापुढे मोफत धान्य मिळणार नाही. सरकारने या अगोदर सहा वेळा नवीन शासन निर्णय प्रसिद्ध करून तारीख वाढवलेली आहे. त्यामुळे यापुढे कोणतीही तारीख वाढवून मिळणार नाही.

त्यामुळे सरकारने सांगितले की आता यापुढे कोणत्याही परिस्थितीत 30 जून 2025 पर्यंत आपली ई-केवायसी ( Ration Card E-KYC ) करणे बंधनकारक आहे. अन्यथा रेशन कार्ड मधून तुमचे नाव वगळले जाणार आहेत. जर आपली ई केवायसी केली नाही. तर बनावट युनिट्स म्हणून या योजनेच्या माध्यमातून वगळण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी आपली लवकरात लवकर केवायसी करून घ्या आणि तुम्ही घरबसल्या देखील मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपली केवायसी पूर्ण करू शकतात.

घरबसल्या ई-केवायसी कशी करायची? Ration Card E-KYC

  • “MERA E-KYC” मेरा ई- केवायसी हे ॲप्लीकेशन मोबाईलवर प्ले स्टोअर वर प्रथम डाऊनलोड करा.
  • याचबरोबर आधार फेस आरडी देखील डाऊनलोड करावे लागेल.
  • सर्वप्रथम तुमचे ॲप उघडावे, त्यानंतर तुमचे लोकेशन टाकून घ्या. त्यानंतर तुमचा आधार क्रमांक टाका.
  • यानंतर कॅपचा कोड आणि ओटीपी टाकून घ्या. तुमचे सर्व तपशील तुम्हाला मोबाईल स्क्रीनवर पाहता येतील. त्यानंतर ‘फेस ई केवायसी’ पर्याय निवडायचा आहे.
  • त्यानंतर तुमचा मोबाईलचा कॅमेरा चालू करावा. आणि फोटोवर क्लिक करायचे. आणि फोटो सबमिट करायचा.
  • अशाप्रकारे अगदी सोप्या पद्धतीने मित्रांनो तुम्ही घरबसल्या आपली रेशन कार्डची ई-केवायसी करू शकतात.

याशिवाय तुम्ही अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून देखील आपली केवायसी पूर्ण करू शकता.

रेशनकार्ड केवायसी कशी करावी? Ration Card E-KYC

त्यासाठी राज्य सरकारच्या सार्वजनिक वितरण प्रणालीच्या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. तेथे रेशन कार्ड साठी ई केवायसी वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर रेशन कार्ड क्रमांक टाकून घ्यावा. तसेच कुटुंबप्रमुखाचा आधारकार्ड क्रमांक टाकायचा त्यानंतर तुम्हाला रजिस्टर मोबाईल नंबर ( Register Mobile Number) वर ओटीपी ( OTP ) पाठवण्यात येतो तो तिथे टाकून घ्यायचा आणि सबमिट बटणवर क्लिक करून घ्यायचे. अशा पद्धतीने तुम्ही वेबसाईटच्या माध्यमातून देखील आपली केवायसी घरबसल्या पूर्ण करू शकता. जे लोक बनावट कागदपत्रांचा वापर करून रेशनचा लाभ घेत आहेत. अशा लोकांना सिस्टीम मधून काढून टाकण्यासाठी नागरिकांना केवायसी करण्याचे आवाहन केंद्र सरकारकडून तसेच राज्य सरकारकडून करण्यात आलेले आहे. “मोफत राशन धान्य” ( Free Ration Scheme) चा फायदा गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही मोहीम सरकारने हाती घेतलेली आहे.

Leave a Comment