Awas Yojana Last Date 2025: घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आली आहे. कारण आवास प्लस 2024 (Awas Plus) ऑनलाइन सर्वे चा फॉर्म भरण्यासाठी सरकारकडून मदत वाढ देण्यात आलेली आहे. यामुळे घरकुल योजनेच्या अर्जदारांना ऑनलाईन सर्व फॉर्म भरता येणार आहेत. अर्ज करण्यासाठी Gharkul Yojana Last Date अंतिम तारीख काय आहे ते आपण पाहूयात.
Awas Yojana Last Date 2025
ग्रामीण भागामध्ये आज देखील खूप मोठ्या प्रमाणात लोक हे कच्च्या घरांमध्ये तसेच झोपडीत राहत असल्याचे पाहायला मिळते. आणि कुटुंब कडे स्वतःचे घर नाही यामुळे या अशा परिस्थितीत बदल घडवून आणण्यसाठी सरकारकडून घरकुल योजना म्हणजेच आवास योजना सुरू केलेली आहे यामध्ये गरज असणाऱ्या लाभार्थ्यांना पक्के तसेच सुरक्षित आणि सन्मान योजना घरं बांधून देण्यासाठी सरकारची उद्दिष्टे निश्चित करण्यात आलेली आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही फक्त घर बांधण्यासाठी आर्थिक मदत करत नाही. तर ती ग्रामीण भागामधील गरिबांना सशक्त आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी योजना आहे. स्वतःचे घर बांधून नवीन आत्मविश्वास देणे सरकारचा उद्देश हा प्रत्येक कुटुंबाला सन्माननीय जगता यावे अशा प्रकारे निश्चित केलेला आहे.
आवास प्लस 2024 (awas plus 2024) घरकुल योजनेचे लाभ घेण्यासाठी नागरिकांनी फॉर्म भरून देणे आवश्यक आहे. ऑनलाइन सर्वे फॉर्म भरण्यासाठी मागील महिन्यात सरकारने 31 मे 2025 पर्यंत मदत वाढ देण्यात आलेली होती. परंतु आता यामध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आली असल्याने आता अर्जदारांना 18 जून 2025 पर्यंत ऑनलाईन सर्वे फॉर्म भरता येणार आहेत. महाराष्ट्र, उत्तराखंड, आसाम, हिमाचल प्रदेश, या चार राज्यांमध्ये ही घरकुल योजनेसाठी मुदत वाढ “PM Awas Yojana Date Extended” देण्यात आल्याचे सरकारने जाहीर केलेले आहे.