या महिलांना 500 रुपये का मिळतात? नवीन नियम पहा Ladki Bahin Yojana May Yadi

Ladki Bahin Yojana May Yadi: महिलांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे मे महिन्याचे पैसे जमा करण्यात आलेले आहेत. महिलांना आतापर्यंत लाडकी बहिण योजनेचे एकूण 11 हप्ते बँक खात्यावर जमा करण्यात आलेले आहेत. लाडकी बहीण योजनेचे महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जातात. परंतु नवीन शासन निर्णयानुसार काही महिलांना 500 रुपये देण्यात येत आहे. त्यामध्ये पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना चालला घेणाऱ्या महिलांच्या खात्यावर या दोन्ही योजनांची मिळून 12,000 हजार रुपये जमा करण्यात येतात. त्यामुळे लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला केवळ 500 रुपये जमा करण्यात येत आहे.

या महिलांना 500 रुपये का मिळतात? नियम काय आहे पहा Ladki Bahin Yojana May Yadi

राज्यात लाडकी बहीण योजनेमध्ये एखादी महिला ‘नमो शेतकरी योजना’ आणि ‘पीएम किसान योजना’ अशा दोन्हीही योजनांची 12 हजार रुपये लाभ घेत असेल, तर महाराष्ट्र सरकारच्या आणि संदर्भात धोरणानुसार थेट बँक खात्यावरती पाठवायची रक्कम 18,000 रुपये निश्चित करण्यात आलेली आहे.

त्यामुळे, लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांना “पी एम किसान योजना” आणि “नमो शेतकरी योजना” या दोन्ही योजनेची मिळून 12 हजार रुपये मिळत असल्यास तर उरलेली 6 हजार रुपयांची रक्कम हे 500 रुपये दर महिन्याला अशा पद्धतीने 12 महिने देण्यात येत आहे. अशा प्रकारचा निर्णय हा सरकारच्या नवीन निर्णयात नमूद करण्यात आलेला आहे.

राज्यात किती लाडक्या बहिणींना 500 रुपये मिळतात? (Ladki Bahin Yojana May Yadi)

राज्य सरकारच्या महिला आणि बालविकास विभागातर्फे लाडकी बहीण योजना राबविण्यात येते. महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदीती तटकरे यांनी एप्रिल 2025 मध्ये दिलेल्या माहितीनुसार, ज्या महिलांना पाचशे रुपये दिले जात आहे त्यांचे आकडेवारी जाहीर करण्यात आलेली होती. पी एम किसान योजना आणि ‘नमो शेतकरी योजनांच्या’ लाभ घेणाऱ्या महिला शेतकरी संख्या ही 7,74,140 एकटी असल्याचे पाहायला मिळाले होते. या महिलांना दर महिन्याला 500 रुपये देण्यात येत आहेत.

Soyabean Rate 2025: सोयाबीनचे दर या वर्षी कसे राहतील?

लाडकी बहिणी योजना मध्ये सरकारकडून कोणताही नवीन बदल करण्यात आलेला नाही. या सर्व राज्यसरकार च्या निर्णयामध्ये अगोदरच जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार सरकारकडून लाडक्या बहिणींना लाभ देण्यात येत आहे.

महिलांना किती रक्कम दिली? ( Ladki Bahin Yojana May Yadi)

  • लडकी बहिणी योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून करण्यात आलेली आहे. तेव्हापासून लाडक्या बहिणीला प्रत्येक महिन्याला 1500 रुपये थेट बँक खाते वर डीबीटी (DBT) मार्फत जमा करण्यात येत आहे.
  • लडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना काही वेळा 2 महिन्याचे पैसे एकत्रित 3,000 जमा करण्यात आलेले आहे.
  • महायुती सरकारने लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची घोषणा केलेली होती.
  • त्या निवडणुकीतील घोषणाची अंमलबजावणी कधी होणार आहे. याकडे सर्व महिलांचे लक्ष लागलेलं आहे.
  • अशाप्रकारे 11 हप्त्याचे मिळून 16500 महिलांना मिळालेले आहेत.

लाडकी बहीण योजना यादी पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट

https://ladakibahin.maharashtra.gov.in

Leave a Comment