उद्यापासून हवामानात बदल; पंजाब डख यांचा नवीन अंदाज पहा

पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या तसेच सततच्या संततधार पावसाने त्रस्त झालेल्या अशा दोन्ही प्रकारच्या शेतकरी बांधवांसाठी हवामान अभ्यासक पंजाब डख यांचा हवामान अंदाज अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

राज्यात एकीकडे काही भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे, तर दुसरीकडे अनेक जिल्ह्यांमध्ये आता पावसाची उघडीप मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच मराठवाड्याची तहान भागवणारे ‘जायकवाडी धरण’ लवकरच १००% भरणार असल्याची सुखद बातमी समोर आली आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची उघडीप

गेल्या काही दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची संततधार पाहायला मिळत आहे. परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, धाराशिव, जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथे पावसाचे सावट असले तरी, १ ऑगस्टपासून वातावरणात मोठा बदल दिसून येईल.

लाडकी बहीण योजना नवीन KYC (केवायसी)करावी लागणार? नवीन नियम पहा

पूर्व व पश्चिम विदर्भ तसेच मराठवाड्याच्या बहुतांश भागांत सकाळपासूनच लख्ख ऊन पडेल. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकरी बांधवांना शेतातील रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी उत्तम संधी मिळणार आहे.

उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

विदर्भ-मराठवाड्यात पाऊस ओसरत असताना, उत्तर महाराष्ट्रात मात्र पावसाचा जोर वाढणार आहे:

  • मुसळधार पावसाचा इशारा: नाशिक, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये, तसेच दिंडोरी, इगतपुरी, अकोले व संगमनेर परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
  • नंदुरबार जिल्हा: नंदुरबार परिसराला अतिवृष्टीचा फटका बसू शकतो, ज्यामुळे लहान-मोठे तलाव तुडुंब भरून वाहण्याची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्र: रिमझिम पाऊस अन् दुपारी सुर्यदर्शन

पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या (रिमझिम) पावसाची हजेरी पाहायला मिळेल. मात्र, दुपारनंतर ढग विरघळून अनेक भागांत सुर्यदर्शन होईल, ज्यामुळे नागरिकांना व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.

जूने रेशनकार्ड बंद! नवीन रेशनकार्ड मोबाईलवरून डाऊनलोड करण्याची सोपी पद्धत पहा Ration Card Personal

जायकवाडी आणि गंगापूर धरणातून दिलासादायक बातमी!

  1. गोदावरी नदीला पूरस्थिती: नाशिक आणि घाटमाथ्यावर होणाऱ्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवला जात आहे. हे पाणी नांदूर मधमेश्वर मार्गे पुढे जायकवाडी धरणाकडे झेपावत आहे.
  2. धरण १००% भरणार: सध्या जायकवाडी धरण सुमारे ७४% भरले असून, १० ऑगस्टपर्यंत ते ९० ते १००% भरण्याची दाट शक्यता आहे.
  3. लाभार्थी जिल्हे: छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांतील पाण्याचा प्रश्न यामुळे सुटणार आहे. १५ ऑगस्टनंतर धरणातून पाणी सोडल्यास खालील सर्व बंधारे व बॅरेजेस पूर्णपणे भरतील.

शेतकऱ्यांसाठी खास सूचना (१ ते ५ ऑगस्ट)

  • वातावरण निवळणार: १ ते ५ ऑगस्ट दरम्यान बहुतांश भागांत ढगाळ हवामान जाऊन ऊन पडेल.
  • अचानक पाऊस: सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली तसेच विदर्भातील यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वर्धा, नागपूर व भंडारा या जिल्ह्यांत स्थानिक पातळीवर ढग जमा होऊन दुपारनंतर अर्धा ते एक तासाचा अचानक जोराचा पाऊस येऊ शकतो

Leave a Comment