Maharashtra Vanrakshak Bharti 2025: महाराष्ट्र वन विभाग भरतीसाठी तयारी करणारे तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण बहुप्रतिक्षित अशी ‘वनरक्षक ’ आणि ‘वनसेवक’ अशी वनविभागाची सर्वात मोठी जाहिरात पुढील आठवड्यात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. वनविभागाकडून एकूण 12,991 पदासाठी सर्वात मोठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ही जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याची माहिती वनमंत्री राम नाईक यांनी प्रसार माध्यमाविषयी बोलत असताना दिलेली आहे. महाराष्ट्र वनविभागा द्वारे तब्बल 12 हजार 991 पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असून येत्या तीन महिन्यात संपूर्ण प्रक्रिया पार पाडली जाणार असल्याची माहिती देखील वनमंत्री यांनी दिलेली आहे.
Maharashtra Vanrakshak Bharti 2025
मित्रांनो, जर तुम्ही Maharashtra Forest Bharti 2025 साठी तयारी करत असाल, आणि तुम्हाला जर अर्ज भरायचा असेल तर वन विभागाकडून नुकतेच एक प्रसिद्धीपत्रक देखील जाहीर करण्यात आलेले असून नवीन आकृतीबंध देखील यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. आणि राज्यातील विभागानुसार कोणत्या विभागात, किती जागा, पात्रता काय, आज प्रक्रिया कशी राहील, अशी सर्व माहिती प्रसिद्धी पत्रिकाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. यातील किती जागा भरल्या जाणार आहे याची सर्व माहिती या आकृतीबंध मध्ये लिहिलेले आहे. ही माहिती देखील आपण खाली सविस्तर पाहणार आहोत.
वनरक्षक भरतीसाठी पात्रता, वेतनश्रेणी, कागदपत्रे, अर्ज पद्धती, आणि अभ्यासक्रम अशा प्रकारची सर्व माहिती आपण कालच्या लेखांमध्ये जाणून घेतलेली आहे. तर रिक्त जागांचा आकृतीबंध आणि जाहिरात कधी प्रसिद्ध होईल अशी सर्व माहिती पाहूयात.
Van Vibhag Bharti 2025 Posts: पदाचे नाव
पद क्र. | पदाचे नाव | एकुण पद संख्या |
---|---|---|
1 | वनरक्षक (Forest Guard) | 12,991 |
रिक्त पदांची संख्या | 12,991 |
Van Vibhag Recruitment 2025
- भरतीचे नाव: महाराष्ट्र वन विभाग भरती
- विभाग: महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत
- नोकरीचे ठिकाण: राज्य वनविभागाच्या अंतर्गत मध्ये असल्याने महाराष्ट्रात कुठेही
- एकूण रिक्त जागा: 12991 ( वनरक्षक वनसेवक आणि इतर पदांचा समावेश आहे)
महाराष्ट्रातील विभागानुसार रिक्त जागा (Maharashtra Vanrakshak Vacancy)
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 👉 येथे क्लिक करा |
महाराष्ट्रातील विभाग | एकुण पद संख्या |
---|---|
नाशिक | 887 |
छत्रपती संभाजीनगर | 1535 |
नागपूर | 1852 |
चंद्रपूर | 845 |
गडचिरोली | 1423 |
अमरावती | 1188 |
यवतमाळ | 665 |
पुणे | 811 |
कोल्हापूर | 1286 |
धुळे | 931 |
ठाणे | 1568 |
इतर | – |
एकूण रिक्त पदांची संख्या | 12,991 |