Land Document 2025: जमिनीवर स्वतःचा मालकी हक्क सिद्ध करणारे हे ‘सात पुरावे’ (Land Document) कोणते आहेत. हे तुम्हाला माहिती आह का? या लेखाच्या माध्यमातून आपण जमिनीवर स्वतःची मालकी सिद्ध करणारे सर्वात महत्वपूर्ण 7 पुरावे कोणते आहेत हे जाणून घेऊयात.
जमीन मग ती शेत जमीन असो किंवा मग बिगर शेत जमीन जमिनीच्या मुद्द्यावरून वादविवाद हे होत असल्याचं नेहमीच समोर येत. आता हेच पहा ना इतकंच काय तर याच मुद्द्यावरून राज्यभरात लाखो खटले सुद्धा प्रलंबित आहेत. बऱ्याचदा तर असं होतं की जमीन करणार एक पण प्रत्यक्षात मालक मात्र दुसराच निघतो. आणि मग त्यामुळे मग जमिनीच्या मालकी हक्क विषयी वाद निर्माण होताना दिसतात. तसे जर वाद निर्माण झाले, तर संबंधित जमीन ही आपल्याच मालकीची आहे. हे सिद्ध करण्यासाठी जमिनीसंबंधीचे काही पुरावे हे कायमस्वरूपी जतन करून ठेवणं गरजेचं असतं हे सात पुरावे नेमके कोणते आहेत पाहूयात.
जमिनीने मालकी सांगणारे हे 7 पुरावे
1) खरेदी खत ( Land Document 2025 )
खरेदी खत: जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात जमिनीची मूळ मालकी सिद्ध करण्यासाठी एक कागद अवश्य पाहिला जातो. आणि तो म्हणजे खरेदीखत खरेदी खत म्हणजे जमिनीच्या मालकी हक्काचा प्रथम पुरावा समजला जातो आणि यावर जमिनीचा व्यवहार हा किती तारखेला किंवा कोणत्या दोन व्यक्तींमध्ये किंवा किती क्षेत्रावर आणि किती रुपयांना झालेला आहे. याची सविस्तर माहिती या कागदावरती असते खरेदीखत झालं की ती माहिती फेरफार वरती लागते. आणि मग सातबारा उतारा वरती जमीन मालकाची नोंद होते.
2) सातबारा उतारा ( Land Document 2025 )
सातबारा उतारा : शेतजमीन चा सातबारा उतारा हा जमिनीचा मालकी हक्काचा सगळ्यात महत्त्वाचा उतारा आहे गाव नमुना सात मध्ये शेतकऱ्याकडे किती जमीन आहे. त्याचा किती जमिनीवरती अधिकार आहे. हे नमूद केलेलं असतं आणि सातबारा उताऱ्या वरती भूधारणा पद्धत ही नमूद केलेली असते यावरून जमिनीचा खरा मालक कोण? त्याची ओळख पटण्यास सुद्धा मदत होते. वर्ग एक या पद्धतीमध्ये अशा जमिनी येतात. आणि ज्यांचं हस्तांतरण करण्यावरती शासनाचे निर्बंध नसतात.
वर्ग 2 मधील जमिनीचा हस्तांतरण करण्यावरती शासनाचे निर्बंध आहेत सरकारी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय या जमिनीचा हस्तांतरण होत नाही. तेव्हा तिसऱ्या प्रकारच्या जमिनी या सरकार या या प्रवर्गामध्ये मोडतात या जमिनी सरकारी मालकीच्या असतात आणि चौथ्या प्रकारात सरकारी पट्टेदार जमिनी येतात यामध्ये सरकारी मालकीच्या पण भाडेतत्त्वावरती दिलेल्या जमिनी असतात या जमिनीत 10:30 50 किंवा 99 वर्षांच्या मुदतीसाठी भाडेतत्त्वावरती दिल्या जातात. सरकारने डिजिटल स्वाक्षरी चा सातबारा उतारा ऑनलाइन सुद्धा उपलब्ध करून देण्यास सुरुवात केलेली आहे. त्याचा देखील तुम्ही लाभ घेऊ शकता. त्यामुळे दरवर्षी अपडेटेड सातबारा उतारा काढणं हे कधीही सोयीस्कर ठरतं.
3) खाते उतारा किंवा आठ अ उतारा ( Land Document 2025 )
खाते उतारा किंवा आठ अ : एखाद्या शेतकऱ्याची जमीन ही वेगवेगळ्या गट क्रमांक मध्ये विभागलेली असू शकते. त्यामुळे या सगळ्या गट क्रमांक मधील शेतजमिनीची जी माहिती आहे. ती माहिती एकत्रितपणे “आठ अ उतारा” म्हणजेच खाते उताऱ्या वरती नोंदवलेली असते. आणि आठ अ उताऱ्यामुळे एखाद्या गावात तुमच्या मालकीची जमीन कोण कोणत्या गटात आहे त्याची माहिती तुम्हाला कळू शकते. त्यामुळे जमिनीच्या मालकी हक्कासाठी आठ अ चा उतारा हा महत्त्वाचा दस्ताऐवज मानला जातो.
महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागानं 1 ऑगस्ट 2020 पासून डिजिटल स्वाक्षरीचा 8अ उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे दरवर्षी तुम्ही अपडेटेड खाते उतारा हात डाउनलोड करून घेऊ शकता.
4) जमीन मोजणी नकाशे ( Land Document 2025 )
जमीन मोजणीचे नकाशे : जमिनीच्या मालकी हक्क संदर्भात काहीही वाद उद्भवला तर जमिनीची मोजणी केली जाते. आणि यावेळी जमीन मोजणीचे नकाशे तुमच्याकडे असल्यास तुम्हाला त्या जमिनीवरील मालकी हक्क हा प्रस्थापित करता येऊ शकतो. त्यामुळे जमीन मोजणीचे नकाशे हे जपून ठेवणं गरजेचं असतं एका ठराविक गट नकाशातील शेतजमीन कोणाच्या नावावरती आहे. आणि त्या शेतकऱ्याचं नाव आणि त्याच्या नावावर किती जमीन आहे. याची सविस्तर माहिती या नकाशावर दिलेली असते. तसंच तुमच्या शेताला लागून असलेल्या शेतजमिनीचे गट क्रमांक देखील दिलेले असतात.
5) जमीन महसुलाच्या पावत्या ( Land Document 2025 )
जमीन महसुलाच्या पावत्या: दरवर्षी जमिनीचा महसूल भरल्यानंतर तलाठ्यामार्फत दिली जाणारी पावती हा सुद्धा जमिनीचा मालकी हक्काबाबतचा महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो. या पावत्या एका फाईलमध्ये सांभाळून ठेवल्यास वेळ प्रसंगी त्याचा ‘पुरावा’ म्हणून तुम्हाला वापर करता येऊ शकतो
6) जमिनी अगोदरचे ( पूर्वीचे) खटले ( Land Document 2025 )
जमिनीचे पूर्वीचे खटले: एखादी जमीन तुमच्या मालकीची असेल, आणि त्या जमिनीबाबत पूर्वी कोणतीही केस किंवा खटला चालला असेल तर अशी कागदपत्र त्यातील जबाबदाच्या प्रती निकाल पत्र इत्यादी कागदपत्र जपून ठेवली पाहिजेत. कारण याचाही वापर जमिनीवर मालकी हक्काचा दावा करण्यासाठी तुम्हाला करता येऊ शकतो.
7) प्रॉपर्टी कार्ड ( property card)
प्रॉपर्टी कार्ड: बिगर शेती जमिनीवर तुमची मालमत्ता असेल, तर त्याच्या मालकी हक्का विषयी जागरूक राहणं आवश्यक असतं बिगर शेत जमिनीवरती माहिती सांगणारा सरकारी कागद म्हणजे प्रॉपर्टी कार्ड आणि ज्या पद्धतीने सातबारा वरती एखाद्या व्यक्तीच्या मालकीची शेतजमीन किती आहे. याची माहिती दिलेली असते त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या नावानं किती बिगर शेत जमीन आहे. याची माहिती या प्रॉपर्टी कार्ड वरती दिलेली असते. तेव्हा बिगर शेतजमीन क्षेत्रात एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती स्थावर मालमत्ता म्हणजेच घर बंगला व्यवसायाची इमारत आहे. याची सगळी माहिती ही प्रॉपर्टी कार्ड वरती नमूद केलेली असते. त्यामुळे बिगर शेत जमीन मालमत्तेवरील स्थावर मालमत्तेचा पुरावा म्हणजे प्रॉपर्टी कार्ड होय. (Land Document 2025)
हे जमीन क्षेत्रातील स्थावर मालमत्तेचा पुरावा म्हणजे प्रॉपर्टी कार्ड होय बिगर शेती क्षेत्रात घर असेल तर संबंधित व्यक्तींना घरपट्टी भरल्याच्या पावत्याही सांभाळून ठेवाव्यात. कारण घराच्या मालकीविषयी जर वाद निर्माण झाला तर त्यांचा पुरावा म्हणून तुम्हाला वापर करता येऊ शकतो.
तेव्हा ही सगळी माहिती तुम्हाला नक्की उपयोगी पडणारी आहे. हे जे 7 पुरावे आहेत याचा वापर तुम्ही नक्की करू शकतात. तेव्हा ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद ( Land Document 2025 )