Pik Vima List: या तारखेला जमा होणार पीक विमा

शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2024 मधील पिक विमा ऑगस्ट 2024 मध्ये मिळणं अपेक्षित होते. परंतु आजतागायत हा पिक विमा मिळालेला नाही‌. विमा वितरणातील विलंब झालेला असून या विलंब साठी मुख्य कारण म्हणजे राज्य सरकारकडून विमा कंपन्यांना जो निधी दिला जातो. तो दिलेला नाहीये परंतु राज्य सरकारकडून हा विमा कंपन्यांना आवश्यक वाटप देण्याचे प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात असून खरीप हंगाम 2024 अंतर्गत पंतप्रधान पिक विमा योजनेच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून 2197.15 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे

30 जून 2025 पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावरती या प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा खरीप (Pradhanmantri Fasal Bima Yojana) हंगामामधील जो काही विमा आहे. तो जमा होणार असल्याची माहिती 1जुन 2025 रोजी आपल्या राज्याचे कृषिमंत्री कोकाटे यांनी दिलेली आहे. अत्यंत शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही दिलासादायक बातमी आलेली असून सर्व शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा.

कर्जमाफी यादी जाहीर: यादीत तुमचे नाव आहे का? असे तपासा ऑनलाईन! Farmer Loan 2026

सरकारकडून अनेक दिवसापासून सांगण्यात येत होते की हा पिक विमा जमा होणार आहे. परंतु अनेक दिवस उलटून देखील शेतकरी या पिक विम्याच्या प्रतीक्षेत असताना देखील सरकारकडून रक्कम मंजूर करण्यात आलेले नव्हती परंतु नुकतीच पिक विम्याची रक्कम मंजूर करण्यात आलेली असल्याकारणाने शेतकऱ्यांना लवकरच ही रक्कम बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे अशी माहिती स्वतः कृषिमंत्री कोकाटे साहेब यांनी दिली आहे.

पिक विमा यादीत आपले नाव कसे चेक करायचे?

  1. सर्वात प्रथम तुम्हाला https://pmfby.gov.in/ (प्रधानमंत्री फसल बीमा योजना) अधिकृत वेबसाईटला भेट द्यायचे आहे
  2. त्यानंतर तुम्हाला येथे “Beneficiary Status” येथे शेतकरी स्टेटस वरती तुम्हाला क्लिक करायचे आहे
  3. त्यानंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती तेथे भरायची आहे.
  4. आपली वैयक्तिक माहिती भरल्यानंतर तुम्हाला तेथे तुमचे स्टेटस दिसते ते तुम्ही पाहू शकता.
  5. वेबसाईटला तुम्हाला पिक विमा जमा झाला आहे का? जमा झाला असेल तर तो तिथे स्टेटस पाहता येते.
  6. आणि जर तुम्हाला पिक विमा जमा झालेला नसेल तर तेथे तुम्हाला कोणत्या कारणाने जमा झाला नाही कारण देखील पाहता येते.
  7. त्यामुळे तुम्ही या वेबसाईटला भेट देऊन 30 जून 2025 पर्यंत पिक विमा जमा झाला आहे किंवा नाही हे तुम्ही चेक करू शकतात.

लेक लाडकी योजना: मुलींना मिळणार १,०१,००० रुपये; असा करा अर्ज! Lek Ladaki Yojana 2026

Leave a Comment