11th Admission Process List New Date: अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी पासूनच अनेक अडचणी येत होत्या. त्या अजून देखील कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळेच 10 जून 2025 ला पहिली यादी जाहीर करण्यात येणार होती ही देखील पुढे ढकलण्यात आलेली आहे. शिक्षण संचालनालयाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 10 जून रोजी जाहीर करण्यात येणार होती. परंतु आता 26 जून 2025 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे ही अकरावीची प्रवेश प्रक्रिया देखील लांबणीवर पडणार आहे. यासंदर्भात विद्यार्थी संघटना तसेच पालकांकडून देखील मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे.
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी वेळ लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असते. तांत्रिक अडचणी येत असल्याकारणाने नोंदणी प्रक्रिया ही 26 मे 2025 पासून सुरू करण्यात आलेली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर अडचणी येत होत्या. आता या अडचणीवर मात करत अखेर 7 जून पर्यंत प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करण्यात आलेली होती. त्यानंतर 10 जून रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार होती. मात्र अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याकारणाने वेळापत्रक देखील पुढे ढकलण्यात आलेली आहे. अशा प्रकारची माहिती शिक्षण संचालनालयाने नवीन वेळापत्रक जाहीर करून आता 10 जून 2025 ऐवजी 26 जून 2025 रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.
घरकुल योजनेचा सर्व फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ Awas Yojana Last Date 2025
अशा प्रकारच्या त्रासामुळे विद्यार्थ्यांना होणाऱ्या मनस्तावाची जबाबदारी ही सरकारने घेऊन विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात यावी आणि त्यांच्यासाठी “लाडके विद्यार्थी योजना” राबविण्यात हरकत नसल्याचे माहिती जयवंत कुलकर्णी यांनी दिलेली आहे.
11 प्रवेश प्रक्रिया पहिली यादी
- 10 जून 2025 रोजी जाहीर होणारी पहिली गुणवत्ता यादी 26 जून 2025 रोजी म्हणजेच 16 दिवस पुढे ढकलण्यात आलेली आहे.
- गेल्या वर्षी पहिली यादी ही 28 जून 2024 रोजी जाहीर करण्यात आलेली होती.
अकरावी प्रवेशासाठी नवीन वेळापत्र
- अंतिम गुणवत्ता यादी व शून्य फेरीचे वाटप:- 11 जून
- शून्य फेरी प्रवेश:- 11 ते 14 जून
- नियमित फेरी एक चे वाटप:- 17 जून
- नियमित फेरी प्रवेश जाहीर करणे नवीन:- 26 जून 2025
- प्रत्यक्ष महाविद्यालयात प्रवेश देणे तारीख:- 27 ते 3 जुलै 2025
- नियमित फेरी दोन साठी रिक्त जागांसाठी यादी जाहीर तारीख:- 5 जुलै 2025